दिल्ली, 13 सप्टेंबर : अनेकदा लोकांना कठीण परिस्थित असताना पैशांची (
Loan Approval) अडचण भासत असते, त्या वेळी कर्ज (
Change in Lifestyle) घेण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु कर्ज घेतल्यानंतर ते परत करणे लोकांना बऱ्याचदा कठीण जाते. अशा वेळी ते पुन्हा कर्जात अडकतात. परंतु अमेरिकेतील एका कपलने चक्क (
American Couple) तब्बल 3 कोटी रुपयांचे कर्ज हे केवळ 17 महिन्यांत चुकवले आहे.
त्यामुळे आता सकारात्मक बातमी असली तरी अनेकांना सुखद धक्का देणारी आहे. या कपलने नेमकी कशी पैशांची बचत केली आणि कसे पैसे वाचवून आपलं 3 कोटी रुपयांचं कर्ज चुकवलं याविषयी खुलासा केला आहे. The Sun च्या रिपोर्टनुसार अमेरिकेत राहणाऱ्या शॅनन (
Shainan) आणि त्यांचे पतींनी आपल्या दैनंदीन खर्चात मोठी बचत केली होती. आपली लाइफस्टाईल त्यांनी मॅनेज केली, तेव्हा त्यांनी आपल्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके केले आहे.
खर्चात केली मोठी कपात
शैनन यांच्या परिवारात त्यांच्या पतीसह एकूण 5 लोक आहेत. त्यांनी 4 कोटी 66 लाखांचे कर्ज काही कामानिमित्त घेतले होते. त्यामुळे आता हे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसमोर होता. त्यासाठी त्यांनी वार्षिक नियोजन केले होते. ज्यात काही कठीण परिस्थितील बचत करण्यासाठी त्यांनी अनावश्यक खर्चासह आवश्यक खर्चालाही आळा घालण्यास सुरूवात केली. त्यात प्रामुख्याने फर्निचरसह खाण्यातील आहाराचाही समावेश होता. तेव्हा कुठे ऐवढे पैसे त्यांनी एकत्र केले होते. त्यांनी आपल्या TikTok अकाऊंटवर त्यांचा सेविंग प्लॅन शेयर केला आहे. ज्याला आता लोक मोठी पसंती देत आहेत.
पैसे कमावण्यासाठी शिक्षिकेनं निवडला भलताच मार्ग; आता लाखो रुपये आहे कमाई, पण...
3 कोटींचे कर्ज 17 महिन्यांत केले चुकते
शॅनन यांनी आपल्या ग्रोसरी बजेट, कपडे आणि राहण्याच्या घराच्या खर्चात कपात केली होती, त्यामुळे त्यांची प्रतिमहिना 86 हजारांची बचत झाली होती. अशा छोटछोट्या घरखर्चांना आळा घालत त्यांनी हे मोठे कर्ज चुकवले आहे, त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर त्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.