• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • महत्त्वाची बातमी! 31 मार्चपूर्वी PAN कार्ड आधारशी लिंक करा; अन्यथा भरावा लागेल दंड

महत्त्वाची बातमी! 31 मार्चपूर्वी PAN कार्ड आधारशी लिंक करा; अन्यथा भरावा लागेल दंड

दिलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास, त्यांना दंड भरावा लागेल आणि 1 एप्रिल 2021 पासून त्यांचं पॅन कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 6 मार्च : पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट, ओळखपत्र आहे. त्याशिवाय इनकम टॅक्स रिटर्न करतानाही पॅन कार्डसह आधार नंबर देणं आवश्यक असतं. सरकारने यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा अवधी 30 जून 2020 वरून वाढवून 31 मार्च 2021 केला आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास, त्यांना दंड भरावा लागेल आणि 1 एप्रिल 2021 पासून त्यांचं पॅन कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होईल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटनुसार (Income Tax Department), पॅन निर्धारित अवधीत आधारशी लिंक न केल्यास, ते इनअ‍ॅक्टिव्ह होईल. डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड धारकांना विना पॅन कार्डधारक (Non-Pan Holders) मानलं जाईल, त्याशिवाय आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

  (वाचा - ...तर Whatsapp वर तुम्हाला मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनीकडून युजर्सला रिमांइडर)

  पॅन कार्ड, आधार कार्डशी कसं लिंक कराल? पॅन आधारशी लिंक करण्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या साईटवर जा. येथे Link Aadhaar चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, नाव, कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर Link Aadhar वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

  (वाचा - 1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम)

  SMS द्वारेही लिंक करता येणार - आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल. या फॉर्मेटमध्ये पाठवा मेसेज - UIDAIPAN (12 अंकी आधार नंबर) स्पेस (10 अंकी पॅन नंबर)
  Published by:Karishma
  First published: