Home /News /money /

महत्त्वाची सूचना! सरकारने जारी केले नियम, सर्वांना 30 जूनपूर्वी हे काम करणं अनिवार्य अन्यथा...

महत्त्वाची सूचना! सरकारने जारी केले नियम, सर्वांना 30 जूनपूर्वी हे काम करणं अनिवार्य अन्यथा...

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख (Deadline for Linking Aadhar with PAN) 30 जून निश्चित केली आहे.

    नवी दिल्ली, 19 जून: सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) एक अत्यंत महत्त्वाची कागदपत्र आहेत. आयटीआर (ITR) फाइल करण्यापासून ते बँकेच्य मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. याशिवाय काही आर्थिक कामांसाठी देखील पॅनकार्ड आवश्यक आहे. तसंच अनेक कामासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून देखील पॅनकार्डचा वापर केला जातो. अशावेळी इन्कम टॅक्सने पॅन कार्डबाबत जारी केलेल्या सूचनेकडे दूर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख (Deadline for Linking Aadhar with PAN) 30 जून निश्चित केली आहे. तोपर्यंत तुम्हील पॅन-आधार लिंक केलं नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो. भरावा लागेल 1000 रुपयांचा दंड जर 30 जूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर 1000 रुपये दंड भरावा लागेल. आयकर कायदा 1961 मध्ये जोडण्यात आलेल्या कलम 234 एच मुळे हा नियम बदलला आहे. दंड आकारला जाण्याव्यतिरिक्त तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय देखील होईल. अर्थात 30 जून नंतर तुम्हाला आर्थिक व्यवहारांकरता पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. पॅन कार्डशिवाय बँकिंग व्यवहार, म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, नवीन बँक खाते उघडणे इ. यासारख्या अनेक आर्थि व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. हे वाचा-Gold Price: या आठवड्यात सर्वात स्वस्त झालं सोनं त्यामुळे आताच करा खरेदी ऑनलाइन करता येईल लिंक तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरते तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल. हे वाचा-खूशखबर! या महिन्यात मिळेल मोफत घरगुती LPG गॅस कनेक्शन, वाचा कुणाला मिळेल लाभ? SMS च्या माध्यमातून तपासा स्टेटस याशिवाय तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्ही SMS च्या माध्यमातून देखील तपासू शकता. याकरता तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS करावा लागेल. तुम्हाला UIDPAN नंतर बारा अंकी आधार आणि 10 अंकी पॅन क्रमांक टाइप करावा लागेल, आणि तो मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवल्यावर तुमच्या पॅन-आधार लिकिंगचे स्टेटस तुम्हाला कळेल. लक्षात असूद्या की हा मेसेज तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुनच करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link, Pan card, Pan card online

    पुढील बातम्या