नवी दिल्ली, 19 जून: तुम्ही जर सोनेखरेदी (Gold Price) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही या काळात सोने खरेदी (Investment in gold) करणाार असाल तर सध्या त्याकरता योग्य वेळ आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी झाले आहेत. जर गेल्या एक आठवड्याबद्दल बोलायचं झालं तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर (Gold Price News) 2000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त दराने घसरले आहेत. अशावेळी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे. जास्त दिवस राहणार नाही ही घसरण कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते जुलैनंतर सोन्याचे दर महागणार आहेत, अशावेळी तुम्हाला आता केलेल्या गुंतवणुकीमध्ये चांगला रिटर्न मिळेल. मात्र महिनाभराने तुम्हाला खरेदी महाग पडू शकते. तज्ज्ञांच्या मते मौल्यवान धातूंच्या किंमतीत झालेली घसरण अस्थायी आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या झालेल्या घसरणीकडे एक संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. सराफा तज्ज्ञांच्या मेत सोन्याचे दर लवकरच पलटतील आणि महिनाभराने दर साधारण 48,500 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचतील. हे वाचा- SBI कडून कोरोना रुग्णांना दिलासा! स्वस्त दरात मिळेल वैयक्तिक कर्ज, अशी आहे योजना एका महिन्याच्या सर्वात निचांकी स्तरावर दर सोन्याचे दर एका महिन्याच्या सर्वात निचांकी स्तरावर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये तेजी आली आहे. जगभरातील विविध बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर झाला आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या माहितीनुसार, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,410 रुपयांवरून कमी होत 47,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर चांदीचे दर 70,300 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 60 रुपये प्रति तोळाने कमी होत 48,350 रुपये झाला आहे. जर तुम्ही सोनेखरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे. कारण रेकॉर्ड हाय वरून सोन्याचे दर 9000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त होते. हे वाचा- IT क्षेत्रात रोजगार कमी झाल्याचा दावा चुकीचा, यावर्षी लाखोंना मिळाल्या नोकऱ्या वाचा काय आहेत लेटेस्ट दर? गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये 45,150 रुपये, मुंबईमध्ये 47,350 रुपये आणि कोलकातामध्ये 47,180 रुपये प्रति तोळा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.