जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC Scheme : एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC ची योजना?

LIC Scheme : एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC ची योजना?

LIC Scheme : एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC ची योजना?

सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) ही एकच प्रीमियम योजना आहे. ही योजना 1 जुलैपासून सुरू झाली आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जानेवारी : भविष्यातील आर्थिक नियोजन (Financial Planning) करताना निवृत्तीनंतर दरमाह उत्पन्न मिळावं ही प्रत्येक नोकरदार व्यक्तीची अपेक्ष असते. त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना (Pension Scheme) घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) असे या पॉलिसीचे नाव आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना ही एकच प्रीमियम योजना आहे. ही योजना 1 जुलैपासून सुरू झाली आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर. सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग आहेत. एलआयसी सरल पेन्शन योजना दोन प्रकारे घेता येईल यात पहिले लाईफ इन्युटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईज आणि दुसरी पेन्शन योजन जॉईंट लाईफ. PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी;हे शुल्क देखील आहे माफ सिंगल लाइफ: यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. जॉइंट लाईफ: या प्लॅनमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये जो दीर्घकाळ जगतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला मूळ किंमत मिळेल. ICICI बँकेने बदलले एफडीचे व्याजदर, कोणत्या योजनेचे व्याजदर किती? सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये » विमाधारकाची पॉलिसी काढताच त्याचे पेन्शन सुरू होईल. » आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवी आहे. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल. » ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येईल. » या योजनेत किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. » ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे. » या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात