मराठी बातम्या /बातम्या /मनी /PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी; हे शुल्क देखील आहे माफ

PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी; हे शुल्क देखील आहे माफ

कर्ज घेणं ही त्रासदायक प्रक्रिया वाटते. तातडीच्या वेळी तरी झटपट कर्ज मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ती पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank).

कर्ज घेणं ही त्रासदायक प्रक्रिया वाटते. तातडीच्या वेळी तरी झटपट कर्ज मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ती पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank).

कर्ज घेणं ही त्रासदायक प्रक्रिया वाटते. तातडीच्या वेळी तरी झटपट कर्ज मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ती पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank).

    नवी दिल्ली, 20 जानेवारी: घर घ्यायचं असो किंवा गाडी घ्यायची असो किंवा अन्य काही कारणांसाठी मोठ्या रकमेची गरज असेल, तर सर्वसामान्य माणसं बँकेकडून कर्ज (loan) घेतात; मात्र त्यासाठी अनेक कागदपत्रं जमा करावी लागतात. कर्ज मंजुरीसाठी वेळ लागतो. त्यामुळे कर्ज घेणं ही त्रासदायक प्रक्रिया वाटते. तातडीच्या वेळी तरी झटपट कर्ज मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ती पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank loan).

    पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात तातडीनं कर्जपुरवठा करणारी एक अभिनव योजना सादर केली आहे. पीएनबी इन्स्टा लोन (PNB Insta Loan) असं या योजनेचं नाव असून, नुकतंच बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या कर्ज योजनेबद्दल ट्वीट केलं. 'तुमचा आनंद तुमच्या मुलाच्या आनंदात आहे! कमी व्याजदरात इन्स्टा लोनसाठी अर्ज करा आणि एंड-टू-एंड कर्ज प्रक्रियेचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी instaloans.pnbindia.in ला भेट द्या,' असं बँकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    'मोकळेपणाने जगण्याची पद्धत पीएनबी इन्स्टा लोनकडून शिका. कमी व्याजदराच्या कर्जासाठी अर्ज करा. आमच्या अधिकृत कॉल सेंटरचे अधिकारी तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत. अधिक माहितीसाठी instaloans.pnbindia.in ला भेट द्या,' असंही ट्वीट बँकेनं केलं आहे. या कर्जासाठी इच्छुक व्यक्ती बँकेच्या instaloans.pnbindia.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात, असंही बँकेनं नमूद केलं आहे.

    बँकेच्या या इन्स्टा लोन योजनेअंतर्गत बँकेच्या शाखेत न जाता काही मिनिटांत ग्राहकाला आठ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. ही सुविधा अखंड 24x7 सुरू राहणार असून, याअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणतंही प्रक्रिया शुल्क (Processing fee on PNB Insta Loan) आकारण्यात येणार नाही, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. या अंतर्गत दोन प्रकारची कर्जं उपलब्ध असून, एक आहे वैयक्तिक कर्ज आणि दुसरं आहे ई-मुद्रा कर्ज.

    हे वाचा-Tax Saving: ELSS मध्ये गुंतवणूक करून किती वाचवता येईल टॅक्स? काय आहे कॅलक्यूलेशन

    वैयक्तिक कर्ज (Personal Loan)

    वैयक्तिक कर्ज सामान्यतः बँकांकडून त्यांच्या विद्यमान ग्राहकांनाच दिलं जातं. थकबाकीची परतफेड, उत्पन्न आणि बँकेशी असलेले खातेदाराचे संबंध या गोष्टी समाधानकारक असतील तर हे कर्ज दिलं जातं. या कर्जाचा व्याजदर जास्त असतो. एखाद्या ग्राहकाकडे उत्पन्न आणि व्यवहारांची काही माहिती नसेल किंवा कर्जाचा इतिहास नसेल तरीही हे कर्ज मिळू शकतं.

    हे वाचा-Pension नियमात मोठा बदल, आता या तारखेला मिळणार निवृत्ती वेतन; वाचा सविस्तर

    ई-मुद्रा कर्ज (E-Mudra Loan)

    पंजाब नॅशनल बँकेने सूक्ष्म, लघु उद्योग क्षेत्रातल्या (Micro and Small Scale Industry) उद्योजकांना त्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी 50 हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रा (MUDRA) कर्जाच्या मंजुरीसाठी डिजिटल कर्ज योजना दाखल केली आहे.

    पीएनबी इन्स्टा लोन योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि ई-मुद्रा कर्ज अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांची सोय असल्यानं वैयक्तिक कर्जदार आणि व्यावसायिक दोघांनाही याचा लाभ घेता येणार आहे. 8 लाखांपर्यंतचं झटपट कर्ज देणारी ही योजना नक्कीच अनेकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

    First published:

    Tags: Pnb, Pnb bank