मराठी बातम्या /बातम्या /मनी /HDFC, SBI नंतर आता ICICI बँकेनेही बदलले एफडीचे व्याजदर, पाहा कोणत्या योजनेवर किती रेट्स

HDFC, SBI नंतर आता ICICI बँकेनेही बदलले एफडीचे व्याजदर, पाहा कोणत्या योजनेवर किती रेट्स

आयसीआयसीआय बँक आता 7 ते 29 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मुदतठेवींवर (Fixed Deposits) 2.50 टक्के आणि 30 से 90 दिवसांच्या मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3 टक्के व्याजदराची ऑफर देत आहे.

आयसीआयसीआय बँक आता 7 ते 29 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मुदतठेवींवर (Fixed Deposits) 2.50 टक्के आणि 30 से 90 दिवसांच्या मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3 टक्के व्याजदराची ऑफर देत आहे.

आयसीआयसीआय बँक आता 7 ते 29 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मुदतठेवींवर (Fixed Deposits) 2.50 टक्के आणि 30 से 90 दिवसांच्या मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3 टक्के व्याजदराची ऑफर देत आहे.

नवी दिल्ली, 20 जानेवारी – एचडीएफसी बँक (HDFC Bank), एसबीआय (SBI) आणि कॅनरा बँक (Canara Bank) या बँकांनंतर आता आयसीआयसीआय बँकेनंही (ICICI Bank) आपल्या मुदतठेवीवरच्या (Fixed Deposits) व्याजदरामध्ये बदल केला आहे. FD च्या नव्या व्याजदरांमधले हे बदल 20 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

बँकेच्या वेबसाइटच्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँक आता 7 ते 29 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मुदतठेवींवर 2.50 टक्के आणि 30 से 90 दिवसांच्या मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3 टक्के व्याजदराची ऑफर देत आहे. 91 ते 184 दिवसांच्या मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3.5 टक्के आणि 185 ते एका वर्षाहून कमी काळ असलेल्या एफडीवर 4.40 टक्के व्याजदर देत आहे. एक वर्ष ते 389 दिवसांच्या एफडीवर बँकेकडून 5 टक्क्यांचा व्याजदर दिला जात आहे.

     वाचा  PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी; हे शुल्क देखील आहे माफ

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) पाच वर्ष 1 दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.60 टक्के व्याजदर देत आहे. पाच वर्षांच्या एफडीसाठी बँकेकडून 5.45 टक्क्यांची ऑफर देण्यात येत आहे. त्यावर आयकर अधिनियम 1961च्या कलम 80C अंतर्गत टॅक्सचा लाभ मिळू शकतो.

वरिष्ठांसाठी फिक्स्ड डिपॉझिट रेट

आयसीआयसीआय बँक सामान्य लोकांच्या तुलनेत वरिष्ठ नागरिकांना (Senior Citizen fixed deposit rates) 0.50 टक्के अधिक व्याजदर देत आहे. त्याअंतर्गत आता 7 ते 29 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मुदतठेवींवर 3 टक्के आणि 30 ते 90 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर 3.50 टक्के व्याजदराची ऑफर देत आहे. 91 दिवस ते 184 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या एफडीसाठी 4 टक्के आणि 185 दिवसांपासून ते एक वर्षाहून कमी काळ असलेल्या एफडीवर 4.90 टक्के, एक वर्ष ते 389 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के व्याजदर देत आहे.

ICICI Bank गोल्डन इअर्स FD रेट्स

     वाचा Post Office च्या 'या' योजनेत पैसे गुंतवून दरमहा मिळवा रिटर्न! अल्पवयीन मुलांच्या नावेही उघडता येते खाते

आयसीआयसीआय बँकेच्या Golden Years FD Rates च्या प्रति वर्ष 0.50 टक्क्यांचा सध्याच्या अतिरिक्त दराहून अधिक, रेजिडंट वरिष्ठ नागरिक (Resident Senior Citizen) ग्राहकांना 0.25 टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे. या योजनेच्या काळादरम्यान नव्या आणि रिन्यूअल अशा दोन्ही प्रकारच्या डिपॉझिट्सवर या दराची ऑफर देण्यात आली आहे. यासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी 20 मे 2020 ते 8 एप्रिल  2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 मुदतीपूर्वी पैसे काढण्यावर दंड

Penalty on premature withdrawal : आयसीआयसीआय बँक वेबसाईटच्या माहितीनुसार, बँकेत ठेव ठेवल्याच्या वेळी प्रभावी दरानं किंवा ठेवीचा कराराचा दर यावर व्याजाची गणना केली जाईल. तसेच काही मुदतीपूर्वी पैसे काढल्यास दंड वसूल केला जाईल.

First published:
top videos

    Tags: Hdfc bank, Icici bank, Money, Sbi fd rates