नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: तुम्ही एलआयसीची पॉलिसी (LIC Policy) घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तुम्ही बंद पडलेली पॉलिसी डिस्काउंटसह सुरू करू शकता. एलआयसीने रिव्हायव्हल कॅम्पेन सुरू केले आहे. ज्याअंतर्गत 23 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021 दरम्यान लॅप्स एलआयसी पॉलिसी सुरू करू शकता. यावर ग्राहकांना सवलत देखील देण्यात येत आहे.
जाणून घ्या रिव्हायव्हल कॅम्पेनविषयी...
एलआयसीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की स्पेसिफिक एलिजिबल प्लानच्या पॉलिसींना काही नियम आणि अटींसह पहिल्या अनपेड प्रीमियमच्या तारखेच्या पाच वर्षांमध्ये पुनर्जीवित केले जाऊ शकते. प्रीमियम पेइंग टर्मदरम्यान संपलेल्या आणि पॉलिसीची मुदत पूर्ण न झालेल्या पॉलिसी या मोहिमेत रिव्हाइव होण्यास पात्र आहेत. दरम्यान टर्म इन्शुरन्स आणि हाय रिस्क असणारे प्लॅन्स यामध्ये नाही आहेत.
हे वाचा-खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी?
LIC ने काय म्हटलं?
सद्यपरिस्थिती एलआयसीने असं म्हटलं आहे की, पेमेंट केलेल्या एकूण प्रीमियमच्या आधारे टर्म इन्शुरन्स आणि उच्च जोखीम योजनांसाठी विलंब शुल्कामध्ये सवलत दिली जात आहे. मात्र वैद्यकीय आवश्यकतांसाठी कोणतीही शिथिलता दिली जात नाही आहे.
हे वाचा-महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं
लेट फीजवर मिळेल सवलत
एक लाख रुपयांपर्यंतच्या एकूण रिसिव्हेबल प्रीमियमसाठी विलंब शुल्कामध्ये 20 टक्क्यांची सूट दिली जात आहे. दरम्यान ही कन्सेशन रक्कम 2000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या रिसिव्हेबल पेमेंटसाठी 2500 रुपयांपेक्षा अधिक लेट फीजवर 25 टक्क्यांची सूट दिली जात आहे. एकूण रिसिव्हेबल प्रीमियम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास लेट फीजवर 30 टक्क्यांची सूट दिली जात आहे. दरम्यान कन्सेशन रक्कम 3000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.