Home /News /money /

खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी? वाचा काय आहे योजना

खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी? वाचा काय आहे योजना

नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अशी माहिती समोर आली आहे की राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ESIC) वैद्यकीय योजनेची व्याप्ती वाढू शकते

    नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अशी माहिती समोर आली आहे की राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ESIC) वैद्यकीय योजनेची व्याप्ती वाढू शकते. या योजनेअंतर्गत रु .30 हजारांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या, ESIC चा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतो ज्यांना 21 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. हा नवीन प्रस्ताव ईएसआयसी बोर्डाच्या बैठकीत ठेवला जाईल, याठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर तो मोदी सरकारकडे पाठवला जाईल. मीडिया अहवालांच्या मते, जर हा प्रस्ताव मंजुर झाला तर 20-25 टक्के कर्मचारी या योजनेच्या अखत्यारीत येतील. ईएसआयसी बोर्डाची बैठक सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या स्कीममध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारासाठी या योजनेचा लाभ मिळवता येतो. हे वाचा-PNB मध्ये खातं असेल तर मिळेल 10 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर ESIC योजनेअंतर्गत मिळणारे फायदे ईएसआयसी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 0.75  टक्क्याचे तर कंपनीकडून 3.25 टक्के योगदान केले जाते. सध्या या योजनेअंतर्गत देशभरातील 6 कोटी कर्मचारी येतात. सध्या या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या लाभांमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे वाचा-करदात्यांना दिलासा! वाढू शकते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख शिवाय आता ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी कमीतकमी सेवेची आवश्यकता नाही आहे. ईपीएफ आणि एमपी कायद्यातील तरतुदींनुसार कौटुंबिक पेन्शन दिले जात आहे. जर कर्मचारी आजारी असेल आणि कार्यालयात येत नसेल तर वर्षातील आजारपणातील लाभ म्हणून 91 दिवस एकूण वेतनापैकी 70 टक्के रक्कम दिली जाते. दरम्यान ईएसआयसीची नवीन पेन्शन योजना-  कोव्हिड पेंशन रिलीफ स्कीम (CPRS) अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जन्मभर पेन्शन प्रदान करते ज्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. याची कमीतकमी रक्कम 1800 रुपये प्रति महिन्यापासून ते मृत कर्मचाऱ्याच्या सरासरी दैनिक वेतनाच्या 90 टक्के असू शकते. ही योजना 24 मार्च 2020 पासून 2 वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Salary

    पुढील बातम्या