मराठी बातम्या /बातम्या /मनी /Bank Holidays: महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं

Bank Holidays: महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं

August 2021 Bank Holidays

August 2021 Bank Holidays

Bank Holidays: जर बँकेसंबंधित एखादं महत्त्वाचं काम असेल तर लवकर पूर्ण करून घ्या. कारण काही शहरात सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: येणाऱ्या काळात तुमचं बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम असेल तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या. कारण नाहीतर तुम्हाला त्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते. कारण या आठवडाभरात अर्था महिनाअखेरपर्यंत एकूण 4 सुट्टया असणार आहेत. या बँक हॉलिडेमुळे (Bank Holiday) तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या (Bank Holiday) तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

हे वाचा-करदात्यांना दिलासा! वाढू शकते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख

RBI जारी करते सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल.

या आठवड्यात हे 4 दिवस असणार सुट्टीचे

28 ऑगस्ट 2021: चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल

29 ऑगस्ट 2021: रविवार

हे वाचा-Gold Silver Price: स्वस्त झालं सोनं-चांदी, किंमतीत मोठी घरसण; इथे तपासा आजचा भाव

30 ऑगस्ट 2021: जन्माष्टमीमुळे बँका राहणार बंद (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपुर, लखनऊ, पाठणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)

31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये बँका बंद

First published:

Tags: Bank, Bank details, Bank holidays