जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी 'हे' काम करा

LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी 'हे' काम करा

LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी 'हे' काम करा

पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. एलआयसीने यासाठी 3 स्टेप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक करणे खूप सोपे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO मार्चमध्ये येत आहे. गुंतवणूकदार या IPO ची आतूरतेने वाट पाहत आहेत. LIC IPO चा काही भाग आपल्या पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवेल अशी अपेक्षा आहे. यामुळे पॉलिसीधारकांना शेअर्सचे वाटप होण्याची शक्यता वाढेल. कंपनी त्यांना किंमतीत सूट देखील देऊ शकते. जर तुम्ही LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO चा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 28 फेब्रुवारीपूर्वी पॉलिसी पॅनशी लिंक करावी लागेल. 28 फेब्रुवारीपर्यंत लिंक न केल्यास तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाही. सर्वप्रथम तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर उघडा. आता हे काम ऑनलाइन केले जाते. दुसरे, तुमची विमा पॉलिसी पॅन (Permanent Account Number) शी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासले पाहिजे. नसेल तर लगेच लिंक करा. एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना तसे करण्यास सांगितले होते. तसेच IPO साठी अर्ज करणे आवश्यक आहे. PNB Payment Rules: पीएनबी ग्राहकांसाठी एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम, चेक करा डिटेल्स पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. एलआयसीने यासाठी 3 स्टेप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक करणे खूप सोपे आहे. Investment Options : शेअर बाजारातील अस्थिरते दरम्यान गुंतवणुकीचा पर्याय, टॉप म्युच्युअल फंड देऊ शकतात चांगले रिटर्न पॉलिसी पॅनशी कशी लिंक करायची? » सर्वप्रथम तुम्हाला LIC च्या पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल. (linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus) » तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक भरावा लागेल. » नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख dd/mm/yyyy फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल. » तुम्हाला तुमचा पॅन एंटर करणे आवश्यक आहे. » त्यानंतर एक कॅप्चा कोड दिसेल, जो भरणे आवश्यक आहे. » त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. » यानंतर, पॉलिसी आणि पॅन लिंक स्थिती तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा मोबाइल फोनवर येईल. एलआयसीच्या वेबसाइटवर पॉलिसींच्या यादीसह पॅन तपशील भरा. तुमचा मोबाईल क्रमांक टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर LIC कडून एक OTP येईल. तो तेथे भरा. फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा ​​संदेश मिळेल जो तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडला गेला असल्याचे दर्शवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात