मुंबई, 26 फेब्रुवारी : सध्या शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता सुरू आहे. जवळपास सात दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. गुंतवणूक करावी की नाही या संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. जरी ठेवली तरी कुठे ठेवायची म्हणजे तोटा होणार नाही, परतावा चांगला मिळायला हवा. गुरुवारच्या घसरणीत, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गेल्या 17 वर्षांतील सर्वात मोठी खरेदी केली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, बाजाराच्या चढ-उतारात घाबरून जाण्याऐवजी, गुंतवणुकीसाठी योग्य जागा शोधण्याची वेळ आली आहे.
CNBC-Awaaz सोबत बोलताना आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीज यांनी गुंतवणूक धोरणाविषयी चर्चा केली. मजबूत परताव्याच्या पोर्टफोलिओचे वर्णन करताना, फिरोज अझीझ यांनी 6 फंडांची नावे दिली आणि त्यातील वाटपाचीही माहिती दिली.
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड (जी) (Franklin India Bluechip Fund(G))
फिरोज अझीझ यांच्या मते, पहिले चार फंड असे आहेत की ते स्वदेशी फंड मानले जातात आणि गुंतवणूकदारांचे 20-20 टक्के पैसे त्यात गुंतवले जातात. फिरोज म्हणाले की त्यांचा पहिला आवडता फंड फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड (जी) आहे ज्यामध्ये 20 टक्के अॅलोकेशन आहे. दुसरा म्हणजे HDFC फ्लेक्सी कॅप फंड (G) (HDFC Flexi Cap Fund(G)) आणि त्यात 20 टक्के अॅलोकेशन आहे. उर्वरित आणखी दोन फंड्समध्ये ICICI Pru फोकस्ड Eq (G) (ICICI Pru Focused Eq (G)) 20 टक्के अॅलोकेशन आणि SBI Focused Eq Fund-Reg(G) 20 टक्के अॅलोकेशन यांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांची बंपर कमाई, 1 लाखांचे बनले 6 कोटी; तुमच्याकडे आहे का हा शेअर?
ICICI Pru US Bluechip Eq Fund(G)
याशिवाय असे दोन विदेशी फंड आहेत जे गुंतवणूकदार भारतीय रुपयाची गुंतवणूक करून खरेदी करू शकतात परंतु त्यांना परतावा डॉलरमध्ये मिळतो. फ्रँकलिन इंडिया फीडर - फ्रँकलिन यू.एस. ओप्पर फंड (G) आहे ज्यात 10 टक्के अॅलोकेशन आहे आणि दुसरा ICICI Pru US Bluechip Eq Fund(G) आहे आणि त्यात 10 टक्के अॅलोकेशन आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांच्या पैशाचे एकूण 100 टक्के वाटप या 6 फंडांमध्ये केले जाते. जेणेकरून त्यांना त्यांच्या पैशावर चांगला परतावा मिळू शकेल.
येत्या 28 फेब्रुवारीपासून 'या' बँकेच्या IFSC, MICR कोडमध्ये बदल होणार, वाचा सविस्तर
पॉलिसी पुशमुळे PSU चांगले काम करू शकतात
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड (जी) बद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लार्जकॅप कॅटगरीने गेल्या एका वर्षात बाजी मारली आहे आणि त्यासाठी पुढील एका वर्षात 20.3 टक्के NAV चे टार्गेट ठेवण्यात आले आहे. एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंडाने फ्लेक्सी फंड प्रकारात बाजी मारली आहे. या फंडात सरकारी कंपन्यांचे 38 टक्के एक्सपोजर आहे. पॉलिसी पुशमुळे PSU चांगले काम करू शकतात.
टॉप परफॉर्मर फंड
ICICI Pru Focused Eq Fund (G)- फिरोज म्हणाले की या फंडाचे पुढील एका वर्षात 22.76 टक्के NAV चे टार्गेट आहे आणि हा त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम परतावा देणारा फंड आहे. SBI फोकस्ड Eq Fund-Reg(G)- फोकस्ड फंड श्रेणीत हे सर्वोच्च कामगिरी करणारे ठरले आहे. या फंडचे आंतरराष्ट्रीय एक्सपोजर 13 टक्के आहे. फिरोज अझीझ म्हणाले की पुढील एका वर्षात 18.3 टक्के NAV चे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
फ्रँकलिन Opportunities Fund(G)- या फंडाने गेल्या 3 वर्षात 19.3 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या 5 वर्षात 17.7 टक्के परतावा दिला आहे. ICICI Pru US Bluechip Equity Fund(G)- या फंडाने गेल्या 3 वर्षात 18.35 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या 5 वर्षात 16.94 टक्के परतावा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.