मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PNB Payment Rules: पीएनबी ग्राहकांसाठी एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम, चेक करा डिटेल्स

PNB Payment Rules: पीएनबी ग्राहकांसाठी एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम, चेक करा डिटेल्स

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 फेब्रुवारी : देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठी पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. पंजाब नॅशनल बँक 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू करत आहे. या अंतर्गत, पडताळणीशिवाय चेक पेमेंट होणार नाही. नियमानुसार, ते अयशस्वी झाल्यास चेक परत केला जाईल.

10 लाख किंवा त्याहून अधिक रुपयांच्या चेकसाठी अनिवार्य

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल. यानंतर, ग्राहकांनी शाखा किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिकचा चेक जारी केल्यास, पीपीएस कन्फर्मेशन अनिवार्य असेल. ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थीचे नाव द्यावे लागेल. PNB ने म्हटले आहे की ग्राहक 1800-103-2222 किंवा 1800-180-2222 वर कॉल करून PPS चे संपूर्ण तपशील मिळवू शकतात. त्याच वेळी, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देखील संपूर्ण माहिती गोळा करू शकतात.

Investment Options : शेअर बाजारातील अस्थिरते दरम्यान गुंतवणुकीचा पर्याय, टॉप म्युच्युअल फंड देऊ शकतात चांगले रिटर्न

पॉझिटिव्ह पे सिस्टम हे फसवणूक शोधण्याचे साधन

रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2022 पासून फसवणूक शोधण्याचे टूल पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. पीपीएसच्या मदतीने चेक पेमेंट सुरक्षित होईल. तर मंजुरीसाठी कमी वेळ लागेल. चेक घेऊन जागोजागी भटकावे लागणार नाही.

गुंतवणूकदारांची बंपर कमाई, 1 लाखांचे बनले 6 कोटी; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

PPS फसवणूक कशी रोखेल?

पीपीएस अंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला चेकचा तपशील एसएमएस, मोबाइल अॅप, नेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे बँकेला द्यावा लागेल. चेक बँकेत पोहोचल्यावर खातेदाराने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. या दरम्यान काही तफावत आढळल्यास चेक नाकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की पीपीएस कन्फर्मेशन नसल्यास चेक परत केला जाईल.

First published:

Tags: Money, Payment, Pnb bank