मुंबई, 23 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा पॉलिसी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. LIC वेळोवेळी देशातील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या स्किम आणत असते. जर तुम्हीही अशीच काही इन्वेस्टमेंट प्लानिंग करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एलआयसीच्या धन बीमा रत्न योजनेबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 पट रिटर्न देखील मिळू शकते. यासोबतच या पॉलिसीमध्ये एकूण 3 फायदे उपलब्ध आहेत.
एलआयसी धन रत्न योजना
एलआयसीच्या धन रत्न योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या जमा राशीच्या 10 पट पैसे मिळवू शकता. एवढेच नाही तर या योजनेशी निगडीत एकूण 3 लाभ निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला मनीबॅक, गॅरंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट्स असे तीन मोठे फायदे मिळतील.
LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ सुविधासोप्या भाषेत समजून घ्या प्लान
-या प्लॅनमध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मुदतीनुसार फायदे मिळतात. या पॉलिसीची मुदत 15 वर्षांपर्यंत आहे. पॉलिसीच्या 13 व्या आणि 14 व्या वर्षी 25% रक्कम तुम्हाला परत केली जाते. -तुम्ही 20 वर्षांचा पॉलिसी प्लान घेतला तर मग 25% रक्कम तुम्हाला 18 व्या व 19 व्या वर्षात परत केली जाते. -25 वर्षांच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला 25% रक्कम 23 व 24 व्या परत केली जाते. -या पॉलिसीमध्ये, तुम्हाला पहिल्या 5 वर्षांत 1000 रुपयांवर 50 रुपयांचा बोनस नक्कीच मिळेल. -ते पुढील 5 वर्षांत म्हणजे 6 ते 10 वर्षांमध्ये 55 रुपये होईल. -मॅच्युरिटीच्या वेळेपर्यंत हा बोनस प्रति हजार रुपये 60 होतो.
या आहेत महत्त्वाच्या गोष्टी
-LIC धन बीमा रत्न योजनेतील गुंतवणुकीचे किमान वय 90 दिवस सांगितले जात आहे. -कमाल वय 55 वर्षे ठेवण्यात आले आहे. या योजनेत किमान 5 लाख रुपये दिले जातात. -विमा रत्न योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेमेंट करता येते. -जर तुम्ही ही पॉलिसी 15 वर्षांच्या मुदतीसाठी किमान रु. 5 लाखांसह विमा उतरवली तर, पॉलिसी परिपक्व होईपर्यंत तुम्हाला एकूण रु. 9,12,500 मिळतील.
LIC पॉलिसी धारकांनो, 31 मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा…