Home /News /money /

LIC IPO बद्दल आली महत्त्वाची माहिती; 4 मेपासून खुला होणार IPO, किती असेल किंमत वाचा..

LIC IPO बद्दल आली महत्त्वाची माहिती; 4 मेपासून खुला होणार IPO, किती असेल किंमत वाचा..

LIC IPO हा सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याचा एक भाग आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यापूर्वी हा IPO 31 मार्च 2022 पर्यंत येणार होता.

    नवी दिल्ली, 26 एप्रिल : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या IPO बद्दल संपूर्ण माहिती समोर आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 4 मे रोजी उघडेल आणि 9 मे रोजी बंद होईल. हा मेगा IPO 2 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. LIC च्या IPO साठी प्राईस बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एक लॉट 15 शेअर्सचा असेल. बिझनेस टुडेला सूत्रांनी याबाबत दुजोरा दिला आहे. त्याला अंतिम रूप देण्यासाठी आज एलआयसी बोर्डाची महत्त्वाची बैठक झाली. पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूट या IPO मध्ये अर्ज करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना आणि LIC कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपयांची सूट मिळेल. तर, पॉलिसीधारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये सूट असेल. IPO चा इश्श्यू साईज 21,000 कोटी रुपये आहे आणि या IPO द्वारे सुमारे 22.14 कोटी शेअर्स विकले जातील. हे वाचा - पंजाबमधील फसवणुकीचं अजब प्रकरण देशभर चर्चेत; नेमकं काय घडलंय? याआधी सरकार देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी LIC मधील 5% हिस्सा विकणार होते. पण आता सरकार IPO साठी फक्त 3.5% हिस्सा देणार आहे. IPO साठी LIC चं मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे. त्यानुसार, आता या IPO चा साईज 21,000 कोटी रुपये असेल. बाजारातील मागणी चांगली असेल तर, सरकार त्यात 5 टक्के वाढ करू शकते, असं एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. मूल्य 6 लाख कोटी रुपये जेव्हा LIC IPO बद्दल चर्चा सुरू झाली, तेव्हा सरकारने त्याचं मूल्यांकन 17 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण आता IPO ला हिट करण्यासाठी LIC चे मूल्यांकन केवळ 6 लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे. हे वाचा -सोन्याच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण, चेक करा नवे दर LIC IPO हा सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याचा एक भाग आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यापूर्वी हा IPO 31 मार्च 2022 पर्यंत येणार होता. परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Business News, LIC, लिलाव

    पुढील बातम्या