मुंबई, 25 एप्रिल : फसवणुकीच्या (Fraud) अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पंजाबमध्ये फसवणुकीची अशी एक घटना समोर आली आहे आहे, जी ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या अजब फसवणुकीचा किस्सा प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. एका घोड्याच्या व्यापाऱ्याने उत्तम दर्जाचा दुर्मिळ काळा घोडा (Rare Black Horse) पंजाबमधील एका माणसाला विकला. त्या व्यक्तीने 23 लाख रुपये भरून घोडा घरी आणला. पण काही दिवसांनी घोड्याचा काळा रंग फिका पडला आणि घोडा तपकिरी रंगाचा दिसू लागला. त्यावेळी खरेदीदाराला समजले की आपली मोठी फसवणूक झाली आहे. या फसवणुकीच्या प्रकारवर, हे फक्त भारतातच होऊ शकते असं हर्ष गोएंका यांनी म्हटलं. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये काळ्या घोड्याचा फोटो पोस्ट करत हर्ष गोएंका यांनी लिहिले की, ‘अलीकडेच पंजाबमध्ये एका घोड्याच्या व्यापाऱ्याने 23 लाख रुपयांची फसवणूक केली. त्याने त्याला उत्कृष्ट जातीचा ‘दुर्मिळ काळा घोडा’ विकला. मात्र, रंग धुतल्यानंतर काळा घोडा तपकिरी झाला. हे फक्त भारतातच होऊ शकते. इथे भयंकर कैदी कारागृहात पाळतात पक्षी, कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
Recently, a man in Punjab was cheated for Rs 23 lakhs by a horse trader who sold him a 'rare black horse' of the finest breed. However, the black horse turned out to be brown after its dye washed off.
— Harsh Goenka (@hvgoenka) April 24, 2022
Only in India! pic.twitter.com/KctJzra6oB
काय आहे नेमकं प्रकरण? फसवणुकीची घटना संगरूर जिल्ह्यातील आहे. टिंदरपाल सिंग सेखॉन, लखविंदर सिंग आणि लचरा खाना उर्फ गोगा खान यांनी पीडित रमेश कुमारची फसवणूक केली आहे. या तिघांनी मिळून रमेशकुमारची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. या तिघांनी उत्कृष्ट जातीच्या दुर्मिळ काळ्या घोड्याच्या नावावर रमेशला घोडा विकला. पण रमेशने घरी येऊन घोड्याला आंघोळ घातली तेव्हा तो तपकिरी झाला. गर्ल रूममेटसाठी पठ्ठ्याने केलीये जाहिरात; अटींची यादी पाहून लोकांचा संताप पोलिसांकडून गुन्हा दाखल रमेश यांनी म्हटलं की, मी एक काळा घोडा घेतला होता, मात्र घोड्याला अंघोळ घातल्यानंतर त्याचा काळा रंग नाहीसा झाला आणि तो तपकिरी घोडा निघाला. रमेश यांनी व्यापाऱ्यांना 7 लाख 60 हजार रुपये रोख दिल्याचे सांगितले. उर्वरित रक्कम दोन चेकद्वारे भरण्यात आली. अशा प्रकारे घोड्यासाठी एकूण 23 लाख रुपये देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण काळ्या रंगाचे घोडे फार दुर्मिळ आहेत. यामुळे त्यांची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे अनेकदा घोड्यांचा रंग मिक्स असतो.