मुंबई, 13 जून : एलआयसी शेअरमध्ये (LIC Share) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज शेअर आणखी पडणार का? या चिंतेने त्यांनी धाकधूक वाढली आहे. लिस्टिंगपासून LIC च्या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झालं आहे. त्यात आजचा दिवस LIC शेअर होल्डर्ससाठी फायद्याची की नुकसानीचा ठरतो हे पाहावं लागेल. सेबीच्या (SEBI) नियमानुसार, अँकर गुंतवणूकदारांना एक महिन्यांचा लॉक इन कालावधी (LIC share Lock-in Period) असतो. म्हणजेच अँकर गुंतवणूकदारांना (Anchor Investors) शेअर अलॉटमेंट एक महिना होल्ड करणे अनिवार्य असते. अँकर गुंतवणूकदारांचा महिनाभराचा लॉक-इन कालावधी 13 जून रोजी म्हणजेच आज संपणार आहे. याचा अर्थ यानंतर ते एलआयसीचे शेअर्स विकू शकतील. जर अँकर गुंतवणूकदारही सेलर बनले तर एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते आणि याचा फटका किरकोळ गुंतवणूकदारांना बसू शकतो. रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा शुक्रवार 10 जून रोजी हा स्टॉक प्रथमच 700 रुपयांच्या जवळपास आला. शेअर 949 रुपयांच्या इश्यू किमतीपासून आतापर्यंत 18.95 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या शेअर 709 रुपयांवर आहे. लिस्टिंगनंतर सातत्याने घसरत असलेल्या देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीची मार्केट कॅप (LIC Market Cap) 4.5 लाख कोटी रुपयांच्या खाली आली आहे. सध्या त्याचे मार्केट कॅप 4.49 लाख कोटी रुपये झाली आहे. जेव्हा सरकारने LIC चा IPO आणला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप अंदाजे 6 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे LIC शेअर्समध्ये सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा शेअर 949 रुपयांच्या इश्यू किमतीपासून आतापर्यंत 17 टक्क्यांनी घसरला आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूटही दिली होती. पॉलिसीधारक कॅटगरी सर्वाधिक सहा पट सबस्क्राईब झाली होती. पण एलआयसीच्या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. शेअर बाजारातील एलआयसीच्या या स्थितीचा कदाचित कुणी विचारही केला नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.