जाहिरात
मराठी बातम्या / मनी / रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा

रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा

रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा

रेपो दरवाढीनंतर ग्राहकांना बचत खात्यात (Saving Account) पैसे जमा करण्यावर आणि एफडी (Fixed Deposit) करण्यावरही लाभ मिळणार आहे. कारण अनेक बँकांनी दोन्हीवर व्याजदर वाढवले ​​आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) 50 बेस पॉईंटची वाढ केली आहे, त्यानंतर अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (Private and Public Banks) वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाच्या व्याजात वाढ केली आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसणार असून त्यांच्या कर्जाचा EMI वाढले आहेत. तर दुसरीकडे आता ग्राहकांना बचत खात्यात (Saving Account) पैसे जमा करण्यावर आणि एफडी (Fixed Deposit) करण्यावरही लाभ मिळणार आहे. कारण अनेक बँकांनी दोन्हीवर व्याजदर वाढवले ​​आहेत. DBS बँक सिंगापूरच्या DBS बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात 10 ते 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. नवीन व्याजदर 9 जून 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 5 ते 6 टक्के व्याजदर असतो. Share Market Update: पुढील आठवड्यात शेअर बाजाराची चाल कशी असेल? कोणते फॅक्टर्स महत्वाचे ठरतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, किमान व्याज दर 2.75% आणि कमाल व्याज दर 5.60% आहे. त्याच वेळी, 2 कोटींहून अधिक गुंतवणुकीवरील व्याज दर 3% आणि कमाल 4.30% झाला आहे. फेडरल बँक (Federal Bank) खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँका त्यांच्या ग्राहकांच्या बचतीवर रेपो दराच्या आधारे परतावा देतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4.40% वरून 4.90% केला आहे. 5 कोटींपेक्षा कमी रकमेसाठी, रेपो दरापेक्षा 2.15% कमी म्हणजे 2.75% व्याजदर आहे. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) कोटक महिंद्राने बचत खात्यांचे व्याजदरही वाढवले ​​आहेत. हे नवे दर 13 जूनपासून लागू होतील. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 50 लाखांपर्यंतच्या ठेवींवर मिळणारे व्याजदर 3.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यापेक्षा जास्त रकमेवर मिळणारे व्याज 4 टक्के असेल. इतर बँका पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ओव्हरसीज बँकेसह अनेक वित्तीय संस्थांनी बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे. पण वाढत्या व्याजामुळे परतावा चांगला मिळत आहे, परंतु कर्ज घेणे महाग होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात