मुंबई, 12 जून : घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घर खरेदीसाठी (Buy Home) मोठी रक्कम गुंतवावी लागते. त्यामुळे स्वस्त घर कुठे मिळतं का याच्या शोधात अनेकजण असतात. तुमचाही स्वस्त घर घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्ही जमीन, व्यावसायिक मालमत्ता आणि अनेक प्रकारची जमीन स्वस्तात खरेदी करू शकता. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. BoB ने ट्वीट केले बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिलावाची (Bank of Baroda E Auction) माहिती दिली आहे. BOB ने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता ड्रीम प्रॉपर्टी होईल स्वतःची. बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावात सहभागी व्हा आणि तुमची स्वप्ने साकार करा.
Ab dream property hogi apni. #BankOfBaroda Mega e-Auction mein participate karein on 17.06.22 and get a chance to unlock the door to your happiness.
— Bank of Baroda (@bankofbaroda) June 10, 2022
Know more https://t.co/tuS9FRD4p1#AzadiKaAmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/zfHkk73WIE
17 जून रोजी लिलाव होणार बँक ऑफ बडोदातर्फे मेगा ई-लिलाव आयोजित केला जात आहे. हा लिलाव 17 जून रोजी होणार आहे. यामध्ये कोणीही बोली लावू शकतो. तुम्ही कोणत्या प्रकारच्या मालमत्तेसाठी बोली लावू शकता? या लिलावात तुम्ही फ्लॅट, घर, ऑफिस स्पेस, जमीन किंवा प्लॉट आणि औद्योगिक मालमत्तेसाठी बोली लावू शकता. Business Idea: केवळ 1 लाखात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिन्याला 8 लाखांची होईल कमाई SARFAESI कायद्यांतर्गत लिलाव होणार आहे बँकेने आपल्या ट्वीटमध्ये असेही सांगितले आहे की, हा लिलाव SARFAESI कायद्याअंतर्गत केला जाईल. तो पूर्णपणे पारदर्शक असेल त्यामुळे कोणीही त्यात सहभागी होऊ शकेल. तुम्ही अधिकृत लिंक तपासू शकता या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.bankofbaroda.in/e-auction या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. Multibagger Share: ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची 1 लाख गुंतवून 70 लाखांची कमाई, तुमच्याकडे आहे का? कोणत्या मालमत्तेचा लिलाव केला जातो? अनेक लोक मालमत्तेसाठी बँकेकडून कर्ज घेतात, परंतु काही कारणास्तव ते कर्ज फेडू शकत नाहीत, तर त्या सर्व लोकांची जमीन किंवा प्लॉट बँक ताब्यात घेते. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.