नवी दिल्ली 19 जुलै: एलआयसी अर्थात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India) या सरकारी कंपनीची विमा पॉलिसी बहुतांश सर्वांकडे असते. सुरुवातीला विमा क्षेत्रात ही एकमेव मोठी कंपनी कार्यरत होती नंतर खासगी कंपन्या (Private Insurance Companies) दाखल झाल्या आणि या क्षेत्रातली स्पर्धा वाढली. ग्राहकांना फायदा करून देणाऱ्या पॉलिसी बाजारात आणण्याची चढाओढ सुरू झाली. एलआयसीही नवनव्या पॉलिसी बाजारात आणत असते. तशीच एक नवी पॉलिसी कंपनीने आणली आहे. या योजनेचं नाव आहे एलआयसी जीवन उमंग पॉलिसी. यामध्ये तुम्ही दररोज 43 रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यावर 27.60 लाख रुपये मिळू शकतात. एवढा मोठा फंड कसा तयार होतो ते पाहूया. कमीतकमी 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) कुणालाही घेता येऊ शकते. या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला वयाच्या 100 वर्षांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. प्रीमियम भरण्याची मुदत 15, 20, 25 आणि 30 वर्षं आहे. त्यानंतर तुम्हाला 27.60 लाख रुपये मिळतात. या पॉलिसीवर कर्जही मिळू शकतं. तसंच गॅरंटीड सर्व्हायव्हल बेनिफिटही (Guaranteed Survival Benefit) इथं उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमाअंतर्गत मिळेल 50 टक्के सब्सिडी, काय आहे मोदी सरकारची योजना 27. 60 लाखांचा मोठा फंड कसा तयार होतो जाणून घेऊया. एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचा महिन्याचा प्रीमियम 1302 रुपये आणि वार्षिक प्रीमियम (Yearly Premium) 15 हजार 298 होतो. या पॉलिसीचा हप्ता तुम्ही 30 वर्षं भरलात तर तुम्हाला एकूण प्रीमियमचा हप्ता 4.58 लाख रुपये भरावा लागेल. त्यानंतर 31 व्या वर्षापासून दरवर्षी तुम्हाला रिटर्न (Yearly Return ) मिळायला लागतील. हा रिटर्न असेल वर्षाला 40 हजार रुपये. 100 वर्षांपर्यंत तुम्ही जर दर वर्षाला 40 हजार रुपयांचा रिटर्न घेत राहिलात तर तुम्हाला एकूण मिळालेली रक्कम होते 27.60 लाख रुपये. पॉलिसीचं हे आहे वैशिष्ट्यं - » या योजनेत पॉलिसीधारकाला 100 वर्षांपर्यंत कव्हर (Policy Cover) मिळतं. » मॅच्युरिटी किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू (Maturity or Death of Policyholder) झाला तर त्याच्या वारसाला एकरकमी पैसे दिले जातात. » 90 दिवसांच्या वयाच्या बाळापासून ते 55 वर्षं वयाच्या व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतात. » प्रीमियम पेइंग टर्म म्हणजे पीपीटी (Premium Paying Term) 15, 20, 25 आणि 30 वर्षांपर्यंत आहे. » प्रीमियम पेइंग टर्म संपेपर्यंत ग्राहकाने सगळे हप्ते भरले असतील तर त्याला कमीतकमी रक्कम मिळण्याची हमी » जीवन विमा रकमेच्या 8 टक्के रिटर्न आयुष्यभर दरवर्षी मिळत राहणार
> या पॉलिसीमध्ये अगदी थोडीशी गुंतवणूक (Investment) केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळत राहतात.
Post Office च्या स्कीममध्ये 5 वर्षात 15 लाखांचे मिळतील 21 लाख, वाचा सविस्तर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाने प्रीमियम भरण्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या वयाच्या 99 व्या वर्षापर्यंत त्याला दरवर्षी ठराविक रक्कम मिळण्याची सोय जीवन उमंग पॉलिसीमध्ये आहे. तसंच जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल तेव्हा ती पूर्ण रक्कमही ग्राहकाला घेता येते. तसंच दरम्यानच्या काळात जर ग्राहकाचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसाला एकरकमी पैसे दिले जातात. या पॉलिसीसाठी प्रीमियमची (Policy Premium) रक्कम 25 हजार रुपये किंवा त्याच्या पटीत असेल आणि मुदत 15,20, 25, 30 वर्षांची असेल. यात जीवन विमा संरक्षण हे संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा प्रीमियम भरण्याची मुदत संपल्यानंतर कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. म्हणजेच काय समजा तुम्ही 30 वर्षं दरवर्षी 25 हजार रुपये प्रीमियम भरलात तर तुम्हाला त्यानंतर तुमच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत वर्षाला ठराविक रक्कम या पॉलिसीअंतर्गत एलआयसी देईल. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- https://www.licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang