मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Tractor Yojna: शेतकऱ्यांना या उपक्रमाअंतर्गत मिळेल 50 टक्के सब्सिडी, वाचा काय आहे मोदी सरकारची योजना

PM Kisan Tractor Yojna: शेतकऱ्यांना या उपक्रमाअंतर्गत मिळेल 50 टक्के सब्सिडी, वाचा काय आहे मोदी सरकारची योजना

PM Kisan Tractor Yojna: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सब्सिडी दिली जाते. याअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करता येतो. जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची योजना

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 जुलै: मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता भासते. ट्रॅक्टर देखील यापैकी एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र काहींना आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर खरेदी करणं शक्य होत नाही, अशावेळी मोदी सरकारने (Modi Government) या शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी ट्रॅक्टर खरेदीवर सब्सिडी देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव पीएम शेतकरी ट्रॅक्टर योजना (PM Kisan Tractor Yojna) असे आहे.

मिळेल 50 टक्के सब्सिडी

केंद्र सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते आहे. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किंमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातील.  अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदानही उपलब्ध करुन देत आहेत.

हे वाचा-Amazon Prime Day: 10000 रुपयांत खरेदी करा हे बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

कशाप्रकारे मिळवाल फायदा?

सरकारकडून या योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना मिळेल जे एक ट्रॅक्टर खरेदी करतात. अर्थात केवळ एकाच ट्रॅक्टरच्या खरेदीवर तुम्हाला 50 टक्के अनुदान मिळेल. याकरता शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँकेचा तपशील, जमिनीची कागदपत्र, पासपोर्ट साइझमधील फोटो इ. दस्तावेजांची आवश्यकता आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याासठी शेतकरी कोणत्याही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात.

हे वाचा-फंड उभा करण्यासाठी विकताय सोन्याचे दागिने? हे लक्षात ठेवून मिळवा चांगली किंमत

PM शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार देतंय वर्षाला 6000 रुपयांचा निधी

याशिवाय विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत, पैकी महत्त्वाची योजना आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधा योजना (PM Kisan Samman Nidhi Yojna). या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना बि-बियाण, शेतीची उपकरणं, खत इ. शेतीविषयक आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपयांच्या तीन हुप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत केली जाते. ऑगस्टमध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Farmer, Modi government, PM Kisan