LPG Gas Cylinder सबसिडी कशी मिळवाल; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

LPG Gas Cylinder सबसिडी कशी मिळवाल; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

अनुदान न मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी (LPG Id) क्रमांक हा तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेला नसणे. यासाठी तुम्ही तातडीने तुमच्या गॅस डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधावा आणि तुमची समस्या त्याला सांगावी.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 एप्रिल : एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. परंतु, एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती 10 रुपयांनी कमी झाल्या असल्या, तरी या अत्यल्प घटीनं सामान्य नागरिकांना फारसा फरक पडणार नाही. परंतु, एलपीजी गॅस सबसिडी किंवा अनुदानाच्या (LPG Gas Subsidy) माध्यमातून नागरिकांना काहीसा दिलासा नक्कीच मिळू शकतो. हे अनुदान थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होतं. परंतु, यासाठी सर्वप्रथम नागरिकांना आपण अनुदानास पात्र आहोत की नाही हे पाहणं महत्वाचं आहे.

जर तुम्ही एलपीजी गॅस अनुदानासाठी पात्र असाल, तर तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते की नाही हे नागरिकांनी तपासणं आवश्यक आहे. जर या अनुदानाची रक्कम तुमच्या बॅंक खात्यात जमा होत नसेल, तर तातडीने आधार कार्ड (Aadhar card) तुमच्या बॅंक खात्याशी लिंक करुन घ्यावे. हे लिंक केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे जाणून घेऊया अनुदानाची नेमकी प्रक्रिया आणि पैसे किती जमा होऊ शकतात त्याविषयी...

अनुदान न मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण

अनुदान न मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी (LPG Id) क्रमांक हा तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेला नसणे. यासाठी तुम्ही तातडीने तुमच्या गॅस डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधावा आणि तुमची समस्या त्याला सांगावी. तसेच यासंदर्भातील तक्रार तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुनही देऊ शकता.

(वाचा - तुमचा फोन नंबर Facebook Data Leaked मध्ये सामिल आहे की नाही; असं तपासा)

घरबसल्या अनुदान कसे तपासावे

- सर्व प्रथम तुम्हाला इंडियन आईलच्या https ://cx.indianoil.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

-यानंतर सबसिडी स्टेटस (Subsidy Status) आणि त्यानंतर प्रोसिडवर (Proceed) क्लिक करावे लागेल.

-यानंतर तुम्हाला सबसिडी रिलेटेड (PAHAL) या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Subsidy not received वर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक आणि एलपीजी आयडी भरावा लागेल.

-ही माहिती भरल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासावी आणि सबमिट करावे.

-त्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रिनवर येईल.

(वाचा - Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? असा करा अपडेट)

कोणाला मिळते अनुदान

विविध राज्यांमध्ये एलपीजी अनुदानाची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना अनुदान दिले जात नाही. 10 लाखांचे हे वार्षिक उत्पन्न पती आणि पत्नी या दोघांचे मिळून गृहित धरले जाते.

First published: April 9, 2021, 7:03 PM IST
Tags: LPG Price

ताज्या बातम्या