रोज 22 रुपये खर्च करून घेता येईल LIC पाॅलिसी, मिळतील 'हे' फायदे

रोज 22 रुपये खर्च करून घेता येईल LIC पाॅलिसी, मिळतील 'हे' फायदे

LIC, Jeevan Amar - LIC नं जीवन अमर ही पाॅलिसी आणलीय. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर: LIC चे प्लॅन्स महाग असतात, अशी तक्रार नेहमीच ग्राहकांची असते. ती दूर करण्यासाठी LIC नं नवा प्लॅन लाँच केलाय. स्वस्त, पारंपरिक आणि सुरक्षित असा टर्म इन्शुरन्स प्लॅन जीवन अमर लाँच केलाय. या प्लॅनमध्ये डेथ बेन्फिट्स पर्याय, लेवल सम अश्योर्ड, इनक्रिजिंग सम अश्योर्डसारख्या सुविधा तुम्ही निवडू शकता. हा अमर लाँच प्लॅन ऑफलाइनच घेऊ शकतो. यात अनेक फीचर्स आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊ.

 10 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत पाॅलिसी टर्म

LIC चा जीवन अमर प्लॅन 18 ते 65 वर्षांच्या व्यक्ती घेऊ शकताच. जास्तीत जास्त मॅच्युरिटी वय 80 वर्ष आहे. जीवन अमरची पाॅलिसी टर्म 10 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असेल.

इन्कम टॅक्स विभागानं केलं सावध, 'हा' SMS आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं खातं

धूम्रपान न करणाऱ्यांना कमी प्रीमियम

सिगरेट ओढणारा आणि न ओढणारा यांच्या प्रीमियममध्ये फरक असेल. पुरुषांचा प्रीमियम महिलांपेक्षा जास्त असेल. तसाच सिगरेट ओढणाऱ्यांचा प्रीमियम जास्त असेल.

पेट्रोल-डिझेल पुन्हा झालं महाग, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

महिलांना करावा लागणार कमी खर्च

रेग्युलर प्रीमियम पर्यायात कुठलीही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. तो सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध होईल. लिमिटेड प्रीमियम पर्यायात काही नियम आणि अटी आहेत. पुरुष आणि महिलांच्या प्रीमियम रकमा वेगवेगळ्या आहेत.

'या' बँकेत पैसे ठेवले तर मिळेल कॅशबॅक आणि सोबत भरपूर सुविधा

प्रीमियम भरण्यासाठी मिळतील पर्याय

एलआयसी जीवन अमर प्लॅनच्या प्रीमियमचे तीन पर्याय मिळतील. सिंगल, रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम. लिमिटेड प्रीमियममध्ये दोन पर्याय येतात. प्रीमियम पेइंग टर्म ( PPT ), 5वर्षांहून कमी असलेली पाॅलिसी टर्म आणि 10 वर्षाहून कमी असलेली दुसरी पाॅलिसी टर्म. प्रीमियम भरण्याचं जास्तीत जास्त वय 70 वर्ष आहे. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पर्यायात कमीत कमी प्रीमियम 3 हजार रुपये आहे. सिंगल प्रीमियम पर्यायात कमीत कमी प्रीमियम 30 हजार रुपये आहे.

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक विमानतळावर दाखल

First published: September 19, 2019, 1:40 PM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading