पेट्रोल-डिझेल पुन्हा झालं महाग, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

Petrol, Diesel - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 11:20 AM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा झालं महाग, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

मुंबई, 19 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलचे भाव तिसऱ्या दिवशीही वाढलेत. सौदी अरेबियात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या देशातून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सौदीतल्या अराम्को तेल कंपनीला या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आलं. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल महाग होण्यावर झालाय. दिल्लीत पेट्रोलचा दर 29 पैसे आणि डिझेलचा 19 पैसे प्रति लीटर महाग झालाय.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचे दर क्रमश: 75.43 रुपये, 78.39 रुपये आणि 75.56 रुपये प्रति लीटर झालेत. तीन महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 68.42 रुपये, 69.24 रुपये आणि 69.77 रुपये प्रति लीटर झालेत.

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर! जेवणासंबंधी रेल्वेनं घेतला 'हा' निर्णय

कसे ठरतात दर?

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

Loading...

लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोनं-चांदी झालं स्वस्त, 'हे' आहेत बुधवारचे दर

अशी मिळवा माहिती

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

सणासुदीच्या आधीच मोदी सरकारचं गिफ्ट, 'इतके' स्वस्त होणार LED आणि LCD

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

SPECIAL REPORT: आदित्य ठाकरेंच्या यात्रेआधी प्रशासनाला खडबडून जाग! एका रात्रीत बुजवले खड्डे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 19, 2019 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...