'या' बँकेत पैसे ठेवले तर मिळेल कॅशबॅक आणि सोबत भरपूर सुविधा

Cashback, Bank - तुम्हाला ही बँक देते भरपूर सुविधा. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 12:27 PM IST

'या' बँकेत पैसे ठेवले तर मिळेल कॅशबॅक आणि सोबत भरपूर सुविधा

मुंबई, 18 सप्टेंबर : एअरटेल पेमेंट्स बँकनं भरोसा सेविंग्ज अकाउंटची सुरुवात केलीय. याची खासीयत म्हणजे यात तुम्ही कमीत कमी बॅलन्स 500 रुपये ठेवलेत तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर मिळतं. याशिवाय खातेधारकाला सरकारकडून सबसिडी मिळते आणि त्यानं या खात्यात ट्रान्सफर केली तर एअरटेल पेमेंट्स बँक प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनवर कॅशबॅकही देते.

एअरटेलनं का सुरू केलं सेव्हिंग्ज अकाउंट?

Airtel नं दावा केलाय  की खूप रिसर्च केल्यानंतर त्यानं हे सेव्हिंग अकाउंट बाजारात आणलंय. कंपनी म्हणालीय की जे लोक बँकिंग सुविधेपासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत ही सुविधा पोचवायचीय. कंपनी पुढे म्हणाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला हातभार आम्ही लावतोय.

जानेवारीनंतर आज सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, 'हे' आहेत आजचे दर

एअरटेल पेमेंट्स बँकेत कमीत कमी बॅलन्स 500 रुपये ठेवलेत तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर मिळतं. ग्राहकाला दर महिन्याला 1 डेबिट ट्रॅन्झॅक्शन करावं लागेल.

Loading...

नोकरदारांना दिवाळीआधी PF मध्ये मिळणार 'इतका' फायदा

सरकारकडून मिळणारी सबसिडी ग्राहकानं या खात्यात ट्रान्सफर केली तर त्याला कॅशबॅक मिळणार.

एअरटेलच्या या भरोसा अकाउंटवर एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंटप्रमाणे 4 टक्के व्याज मिळू शकतं.

एअरटेलचं हे प्राॅडक्ट 1.25 लाखापेक्षा जास्त बँकिंग पाॅइंट्सवर उपलब्ध आहे. ग्राहकाला हवं असेल तर तो या अकाउंटमधून पैसे काढू शकतो.

... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद

यातले पैसे ग्राहक देशातल्या आधार अनबेल्ड पेमेंट सिस्टिम सुविधा असणाऱ्या आउटलेटमधून काढू शकतात.

ग्राहक खात्यातली रक्कम चेक करून मिनी स्टेटमेंट काढू शकतात.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Airtel
First Published: Sep 18, 2019 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...