इन्कम टॅक्स विभागानं केलं सावध, 'हा' SMS आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं खातं

Income Tax - इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सावधानतेचा इशारा दिलाय. त्याबद्दल घ्या जाणून

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 12:28 PM IST

इन्कम टॅक्स विभागानं केलं सावध, 'हा' SMS आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं खातं

मुंबई, 19 सप्टेंबर : इन्कम टॅक्स विभागानं पुन्हा एकदा सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. आयटी विभागानं येणाऱ्या खोट्या मेसेजपासून सावध केलंय.काही लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसंदर्भात खोटे ईमेल आणि SMS येतायत. ते खरे नाहीयत. म्हणूनच आयकर विभागानं जनतेला सावध केलंय. मेसेजमध्ये लिहिलंय की, असा मेसेज येतो ज्यात एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून टॅक्स रिफंड मिळेल, असं लिहिलं असतं. Url http://151.80.90.62/ITRefund असंही दिलं असतं. पण आयकर विभागानं म्हटलंय की यावर चुकूनही क्लिक करू नका.

करदात्यानं ट्वीट करून आयटी डिपार्टमेंटकडे मागितलं उत्तर

एका करदात्यानं हा SMS मिळाल्यानंतर आयकर विभागाशी संपर्क साधला आणि SMSला ट्विटर हँडलवर शेअर केलं. त्यानं विचारलं की हा SMS बरोबर आहे का? त्यावर आयकर विभागानं सांगितलं की त्यांनी असा कुठला मेसेज पाठवला नाहीय.

पेट्रोल-डिझेल पुन्हा झालं महाग, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

तुमचं कसं होईल नुकसान?

Loading...

तुम्हाला खोटी लिंक असलेला मेसेज आला आणि त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही अडचणीत याल. कारण लिंक उघडली की तुमच्याकडे युजरनेम, पासवर्ड आणि क्रेडिट कार्डाची माहिती मागितली जाईल. ती तुम्ही दिलीत तर मात्र मोठं नुकसान होऊ शकतं.

मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 11 लाख 52 हजार जणांना मोठी गिफ्ट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करताना अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यातला एक होता - डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबतचं धोरण. मोदी सरकारने रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांवर भर देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कॅश ट्रान्झॅक्शनचे काही नियम सरकारने अधिक कडक करण्याचं ठरवलं आहे.

VIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Sep 19, 2019 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...