मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC Jeevan Pragati Plan: दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड, वाचा सविस्तर

LIC Jeevan Pragati Plan: दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड, वाचा सविस्तर

LIC Jeevan Pragati Plan: ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखीम असल्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

LIC Jeevan Pragati Plan: ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखीम असल्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

LIC Jeevan Pragati Plan: ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखीम असल्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

मुंबई, 07 जानेवारी: जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चांगला (How to get good return) परतावा तर मिळतोच पण अशी गुंतवणूक केल्यास जोखीमही कमी असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC New Scheme) ने अशीच एक विशेष योजना आणली आहे, ज्याचे नाव आहे LIC जीवन प्रगती योजना (LIC Jeevan Pragati Plan). ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखीम असल्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये पैसे गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळवू शकता. ही योजना खरेदी केल्यावर बचत आणि सुरक्षितता दोन्हीची हमी दिली जाते. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीतर्फे दिली जाणारी ही योजना गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकते.

20 वर्षापर्यंत करावी लागणार गुंतवणूक

एलआयसीच्या या योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुम्हाला यात दरदिवशी 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सलग 20 वर्षे गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला 28 लाखांचा फंड एकरकमी मिळेल. हा निधी तुम्ही भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

हे वाचा-ATM कार्ड वापरता?, मग ही महत्त्वाची बातमी खास तुमच्यासाठी

जीवन विम्यासह डेथ बेनिफिटची सुविधा

LIC जीवन प्रगती योजनेत जीवन विम्यासह रिस्क कव्हर देखील मिळेल. याशिवाय जर नियमित प्रीमियम भरल्यास डेथ बेनिफिटची सुविधाही मिळते. दर पाच वर्षांनी यामध्ये वाढ होते. म्हणजे आधी जेवढे पैसे मिळणार आहे, त्यात नंतरच्या पाच वर्षांमध्ये वाढ झालेली असते.

हे वाचा-मुलीच्या लग्नासाठी हवाय मोठा फंड? या स्कीममध्ये करा गुंतवणूक

विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 100 टक्के रक्कम

पॉलिसी खरेदी केल्यानंतर पाच वर्षानंतर विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला या योजनेअंतर्गत मूळ विम्याच्या रकमेच्या  (Sum Assured) 100% रक्कम मिळेल. 6-10 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम मिळेल. 11-15 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या 150 टक्के आणि 16-20 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या 200% रक्कम नॉमिनीला दिली जाईल.

First published:

Tags: LIC, Money