Home /News /money /

Investment Planning: मुलीच्या लग्नासाठी हवाय मोठा फंड? या स्कीममध्ये करा गुंतवणूक

Investment Planning: मुलीच्या लग्नासाठी हवाय मोठा फंड? या स्कीममध्ये करा गुंतवणूक

येणाऱ्या काळात मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवायचा (Best Saving Options) विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा फंड गोळा करण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. वाचा काय आहे गुंतवणुकीसाठी पर्याय

    मुंबई, 06 जानेवारी: मुलीचं लग्न धुमधडाक्यात व्हावं (Wedding in India) अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तुम्ही देखील येणाऱ्या काळात मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवायचा (Best Saving Options) विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा फंड गोळा करण्यासाठी  काळजी करण्याची गरज नाही. कारण आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा निधी तयार करू शकता. गुंतवणूक सल्लागारांचे म्हणणे आहे की जर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करत असाल तर तुम्ही वेळेची वाट पाहू नका. जेव्हा तुमच्याकडे पैशांची बचत होईल त्या वेळेपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. गुंतवणूक करताना नेहमी शिस्तीत व्यवहार करा. म्हणजे वेळेवर गुंतवणूक करत राहायची किंवा ती वाढवत राहायची. जाणून घ्या तुम्ही कशी आणि कुठे गुंतवणूक करू शकता. हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू SIP मध्ये करा गुंतवणूक तुम्हाला जर चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर तुम्ही सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान (SIP) मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून काही वर्षात चांगला रिटर्न मिळवू शकता. याकरता तुम्हाला कमीतकमी 500 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करावी लागेल. अशाप्रकारे जमा करा 50 लाखांचा फंड 7 वर्षांत 50 लाखांचा निधी तयार करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 40,000 रुपये गुंतवावे लागतील. ही गणना सरासरी 12% CAGR रिटर्न गृहीत धरुन करण्यात आली आहे. असे दिसून आले आहे की इक्विटीमध्ये दीर्घकालीन चांगला रिटर्न मिळतो आहे. हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू सल्लागारांचे म्हणणे आहे की मोठ्या रकमेने गुंतवणूक सुरू करणे आवश्यक नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 100 रुपयेही गुंतवू शकता. पण जर तुम्हाला SIP द्वारे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 500 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही नियमितपणे दर महिन्याला एवढी गुंतवणूक केली तर 20 वर्षांत ही रक्कम 5 लाख रुपयांच्या जवळपास होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Savings and investments, Wedding

    पुढील बातम्या