नवी दिल्ली, 06 जानेवारी: वेळेअभावी बँकेत न जाता जवळच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालंय. कारण आजकाल बँकेत जाऊन रांगा लावून पैसे काढणं किंवा भरणं प्रत्येकालाच शक्य होतंच असं नाही. त्यातच कोरोना काळात तर ऑनलाईन बँक व्यवहारांमध्ये (Online Banking) चांगलीच वाढ झाल्याचं चित्र आहे. पण आजही एटीएम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे. एटीएम कार्डबाबतच एक महत्त्वपूर्ण वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे.
बँक खातं उघडलं की, त्यासोबतच एटीएम कार्ड (ATM card), ऑनलाईन बँकिंग आणि इतर माहितीपत्रकं मिळतात. त्यापैकी एटीएम कार्ड हे सर्वांत आधी वापरलं जातं. कारण पट्कन पैसे काढण्याचा तो सोपा मार्ग आहे. पण एटीएम कार्डने जशी सोय होते, तसंच कधीतरी गैरसोयही होऊ शकते. कारण बरेचदा असं दिसून येतं की, एटीएममध्ये गेल्यावर आपण मशीनमध्ये रकमेचा आकडा टाकतो. मग अकाउंटमधून ते पैसे कटही होतात. पण हातात कॅश येत नाही. म्हणजेच तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही. असं कोणा सोबतही होऊ शकतं. अशावेळी गोंधळून न जाता काय करता येईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
हेही वाचा- काय आहे तुमचं Status? जाणून घ्या PM Kisan च्या स्टेटसमध्ये असं लिहून आल्यास काय होतो अर्थ
एटीएम कार्डचा वापर करताना अकाऊंटमधून तुमचे पैसे कट झाले, परंतु हातात आले नाही. अशावेळी बँक हे पैसे पाच दिवसांत ग्राहकाला परत करण्यासाठी बांधील असते. एवढंच नाहीतर जर बँक तुम्हाला तांत्रिक कारणांमुळे (Technical Glitch) एटीएम कार्डातून कट झालेले पैसै दिवसांत परत देऊ शकली नाही तर प्रती दिवसाच्या हिशेबाने बँकेला दंडही पडतो. तुमचे पैसे वेळेत न दिल्याबद्दल बँकेला प्रतिदिवस 100 रुपयांचा दंड बसतो. पाच दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे न आल्यास तुम्ही बँकेच्या तक्रार निवारण विभागाशी संपर्क करू शकता.
हेही वाचा- Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, काय दराने मिळतायंत हे मौल्यवान धातू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.