Home /News /money /

Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी

Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी

Know Everything about IPO

Know Everything about IPO

Oyo ही कंपनी देखील बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीमध्ये सॉफ्टबँकेची 46% भागीदारी आहे. या इश्यूमधून कंपनी फंड उभा करून बिझनेस मजबुत करण्याच्या विचारात आहे.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: भारतातील हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप कंपनी ओयो हॉटेल्स अँड रुम्स (Oyo Hotels and Rooms) पुढील महिन्यात आयपीओसाठी अर्ज जमा करू शकते. रॉयटर्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या आयपीओच्या माध्यमातून 1.2 अब्ज डॉलर अर्थात जवळपास 8000 कोटींचा फंड उभा करण्याची कंपनीची योजना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये फ्रेश इश्यूसह ऑफर फॉर सेल (Offer for Sale) देखील समाविष्ट आहे. मात्र याप्रकरणी अद्याप ओयो (OYO Initial Public Offer) कडून याबाबत कोणतंही उत्तर आलेलं नाही. सॉफ्टबँकेची ओयोमध्ये 46% भागीदारी आहे. इश्यूमधून पैसे उभारून कंपनी आपला व्यवसाय बळकट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कोरोनाव्हायरसचे संक्रमण वाढल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे कंपनी गेल्या काही महिन्यांपासून सतत अडचणीत आहे. वारंवार कामावरून काढून टाकणे, खर्च कमी करणे, तोटा आणि जगभरातील कमकुवत अर्थव्यवस्था यामुळे कंपनीवर आर्थिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम झाला आहे. हे वाचा-न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द, पण बिर्याणीचं बिल 27 लाख रुपये! कोणी मारला ताव? कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी जुलैमध्ये सांगितले होते की, कोरोनाव्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी कंपनीचा जसा व्यवसाय होता त्या स्थितीमध्ये व्यवसाय पोहोचणार आहे. गेल्या महिन्यात, ओयोला मायक्रोसॉफ्ट कॉर्पकडून 50 लाख डॉलरचा निधी मिळाला होता. दरम्यान कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि सिटी कंपनीचे इश्यू सल्लागार आहेत. या वर्षी जुलैमध्ये झोमॅटोच्या जबरदस्त लिस्टिंगनंतर अनेक कंपन्यांनी आयपीओ आणण्याची योजना आखली आहे. बर्कशायर हॅथवे इंकचा सपोर्ट असणारी पेटीएम ही कंपनी देखील यावर्षी नोव्हेंबरमध्ये इश्यू लाँच करणार आहे. त्याच वेळी, खाजगी इक्विटी फर्म Nykaa देखील IPO आणण्याची तयारी करत आहे. हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3% वाढीआधी मिळणार हे 5 मोठे फायदे; वाचा सविस्तर Paras Defence IPO चा आज शेवटचा दिवस Paras Defence IPO चा आज शेवटचा दिवस आहे. आज हा आयपीओ क्लोज होणार आहे. डिफेन्स सेक्टरच्या या कंपनीचा इश्यू ओपन झाल्यानंतर काही वेळातच पूर्ण सब्सक्राइब झाला आहे.  Paras Defence ने 171 कोटींचा आयपीओ लाँच केला आहे. यामध्ये 140.6 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू जारी करण्यात आले आहेत. तर 30 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विक्री करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Savings and investments

    पुढील बातम्या