• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: पुन्हा उतरला सोन्याचा भाव, रेकॉर्ड स्तरापेक्षा 10799 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: पुन्हा उतरला सोन्याचा भाव, रेकॉर्ड स्तरापेक्षा 10799 रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price, 23 September 2021: सोन्याच्या किंमतीत गुरुवारी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किंमतीत आज किरकोळ तेजी पाहायला मिळाली

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात आज 23 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे सोन्याचे दर 45,500 रुपये प्रति तोळापेक्षा कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमती (Silver Price Today) किरकोळ वधारल्या आहेत. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 45,685 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर 59,583 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांचांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Rate Today on 23rd Sept 2021) गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 294 रुपयांची घट झाली. राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत आज 45 हजार रुपयांच्या खाली घसरून 45,401 रुपये प्रति तोळावर ​​बंद झाली आहे. यामुळे पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे कारण सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 10,799 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. या दराच्या तुलनेत आज सोन्याचा दर 10799 रुपयांनी कमी आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव घसरून 1,768 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा-Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी चांदीचे नवे दर (Silver Rate Today on 23rd Sept 2021) सोन्याच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीचे भाव किरकोळ 26 रुपयांनी वाढून 59,609 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाही आहेत. यानंतर चांदी 22.78 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. हे वाचा-घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवा प्लॅन,कुणाच्या खात्यात येणार पैसे का वधारले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 73 पैशांनी वाढून 73.77वर पोहोचले आहे. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या वक्तव्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. फेड रिझर्व्हने म्हटले आहे की सरकार नोव्हेंबर 2021 पर्यंत दर महिन्याला बाँडची खरेदी कमी करू शकते. शिवाय असे म्हटले आहे क, व्याज दर अपेक्षेपेक्षा वेगाने वाढू शकतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: