मुंबईर, 11 फेब्रुवारी: सरकार मार्चअखेर एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) बाजारात आणण्यास उत्सुक आहे, परंतु गुंतवणूकदार त्याहूनही अधिक उत्सुक आहेत. सरकारने पॉलिसीधारकांसाठी (LIC Policy Holders) सवलत जाहीर केल्यापासून, डिमॅट खाते (Demat Account) उघडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोणताही गुंतवणूकदार ही संधी हातून जाऊ देऊ इच्छित नाही, असे ब्रोकर्सचे म्हणणे आहे. एलआयसीचा आयपीओ लॉन्च करण्याची सरकार जितकी तयारी करत आहे, तितकीच गुंतवणूकदारही त्यांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करत आहेत. यामुळे जानेवारी महिन्यातच 34 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली असून फेब्रुवारीमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पॉलिसीधारकांसाठी राखीव कोटा सरकारने एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आयपीओ कोटा देखील राखून ठेवला आहे. पॉलिसीधारकांना IPO मध्ये जारी केलेल्या एकूण शेअर्सपैकी 10 टक्के स्वतंत्रपणे मिळतील. याशिवाय आयपीओमधील शेअर्सच्या मूल्यावरही सूट दिली जाईल. यामुळेच पॉलिसीधारक अधिकाधिक डीमॅट खाती उघडत आहेत जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल. Gold Price Today: रेकॉर्ड स्तरावरुन 7500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा 10 ग्रॅमचा दर ब्रोकर्सही योजना राबवत आहेत पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ब्रोकर्सही विविध योजना राबवत आहेत. ब्रोकर्स, डिजिटल आणि ट्रेडिशनल दोन्ही पॉलिसीधारकांना डिमॅट खाती उघडण्यासाठी गिफ्ट व्हाउचरसह विविध सवलती देत आहेत. एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकार सुमारे 1 लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत. Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, पाहा डिटेल्स कंपनीचे एजंटही संधीची वाट पाहत आहेत एलआयसीच्या एजंटचे म्हणणे आहे की त्याला गुंतवणुकीपेक्षा कंपनीशी अधिक इमोशनल अटॅचमेंट आहे आणि ते ही संधी कोणत्याही प्रकारे जाऊ देऊ इच्छित नाही. त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असेल की आम्हीही एलआयसीच्या शेअर्सचे मालक होऊ. विशेष म्हणजे देशभरात एलआयसीशी जवळपास 13 लाख एजंट संबंधित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.