मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, पाहा डिटेल्स

Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, पाहा डिटेल्स

पॉलिसी घेताना भविष्यातील योजना (Future Plans) आणि त्यासाठी अपेक्षित खर्च याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसीची निवड करणं सोपं जातं.

पॉलिसी घेताना भविष्यातील योजना (Future Plans) आणि त्यासाठी अपेक्षित खर्च याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसीची निवड करणं सोपं जातं.

पॉलिसी घेताना भविष्यातील योजना (Future Plans) आणि त्यासाठी अपेक्षित खर्च याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसीची निवड करणं सोपं जातं.

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात लोक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (Life Insurance Policy) घेण्यावर अधिक भर देत आहेत. युवकांचाही याकडे कल अधिक आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या शिक्षणासोबतच सेवानिवृत्तीनंतरच्या कालावधीत विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, पॉलिसी घेताना भविष्यातील योजना (Future Plans) आणि त्यासाठी अपेक्षित खर्च याचा अंदाज घेणं आवश्यक असतं. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसीची निवड करणं सोपं जातं. एका पॉलिसीमधून सर्व गोष्टी साध्य होत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवावी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी फंड तयार करायचा असेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं संरक्षण करण्याव्यतिरिक्त जोडीदारासाठी आकस्मिक फंड तयार करायचा असेल, तर एका लाइफ इन्शुरन्स प्लॅनमधून ही सर्व उद्दिष्टं साध्य होऊ शकत नाहीत. तुम्ही पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उत्पन्नाच्या किमान 10 टक्क्यांपर्यंत संरक्षण घ्या - पहिल्यांदा पॉलिसी घेताना किती कव्हर (Cover) घ्यायचं याविषयी बहुतेक लोक गोंधळलेले असतात. यासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या किमान दहा पट लाइफ कव्हर घ्यावं, अशी शिफारस बहुतांश आर्थिक तज्ज्ञ करतात. हा सल्ला चांगला असला तरी प्रत्येकाने आपल्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन कव्हर ठरवावं. याचा निर्णय तुम्ही तुमचे उत्पन्न, कर्ज, बचत आणि जीवनशैली आदी गोष्टींच्या आधारे घेऊ शकता.

हे वाचा - शेतीही होणार 5G! तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात येणार क्रांती, हे आहेत 4 मार्ग

आर्थिक गरजांचं पुनरावलोकन आवश्यक - वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक गरजा वेगवेगळ्या असतात. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आर्थिक गरजा वेगळ्या असतात आणि जेव्हा तुम्हाला पत्नी, मुले असतात, तेव्हा तुमच्या आर्थिक गरजा वेगळ्या असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओचं (Portfolio) वार्षिक किंवा नियमित कालावधीत पुनरावलोकन करत राहणं महत्त्वाचं आहे. तथापि, ही गोष्ट दरवर्षी करणं अवघड असू शकतं. त्यामुळे लग्न, नवीन घर, मुलाचा जन्म आदींसारख्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर तुम्ही तुमच्या संरक्षण आवश्यकतांचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे.

हे वाचा - Credit Card बिल भरताना मिनिमम पेमेंट करता? मग व्हा सावध,जाणून घ्या काय आहेत तोटे

आवश्यक माहिती द्या आणि रिसर्च करा - तुम्ही जेव्हा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता, त्यावेळी सर्व आवश्यक माहिती सांगा. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा मुख्य उद्देश कुटुंबाला तुमच्या अनुपस्थितीत आर्थिक आधार देणं हा आहे. त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना आपल्याबद्दलची सर्व माहिती (Information) द्या. जेणेकरून क्लेम सेटलमेंट (Claim settlement) प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. तसंच, तुम्ही कोणती पॉलिसी खरेदी करावी, याबद्दल तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. सल्लामसलत केल्यानंतर तुम्हीदेखील काही रिसर्च करणं आवश्यक आहे. अशी करा विमा कंपनीची निवड - विमा कंपनी (Insurance company) प्रसिद्ध आहे अथवा नाही, ती का चर्चेत आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधू शकता. तुम्ही कंपनीच्या क्लेम सेटलमेंटसारखा महत्त्वाचा डेटा पाहू शकता. पॉलिसी घेण्यासाठी विमा कंपनी निवडण्याकरता या गोष्टी तुम्हाला मदत करतील.
First published:

Tags: Insurance, Money

पुढील बातम्या