Home /News /money /

Gold Price Today: रेकॉर्ड स्तरावरुन 7500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा 10 ग्रॅमचा दर

Gold Price Today: रेकॉर्ड स्तरावरुन 7500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा 10 ग्रॅमचा दर

Gold Price Today: मागील चार दिवसांपासून सोने दरात (Gold Rate) तेजी होती. मात्र आज सोने दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली.

    नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: मागील चार दिवसांपासून सोने दरात (Gold Rate) तेजी होती. मात्र आज सोने दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोनं 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. तर चांदीच्या किमतीतही (Silver price today) मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदी दर (Gold Silver Price) - एप्रिल डिलीव्हरी गोल्डची किंमत आज 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह 48,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीचा भाव 1.10 टक्क्यांनी घसरला असून 62,568 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं एप्रिल वायदे भाव MCX वर 48,715 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं आता जवळपास 7,500 रुपये स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. कमॉडिटी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होण्याची अनेक कारणं सांगितली होती. युक्रेन संकटाने जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु आज चार दिवसांच्या वाढीनंतर सोने दर काहीसा कमी झाला आहे.

    हे वाचा - करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता वर्षातून इतक्या वेळाच ITR अपडेट करता येणार

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Finance, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या