मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC Credit Card: इन्शुरन्स कव्हरपासून नो-कॉस्ट EMI पर्यंत, मिळतील हे महत्त्वाचे फायदे

LIC Credit Card: इन्शुरन्स कव्हरपासून नो-कॉस्ट EMI पर्यंत, मिळतील हे महत्त्वाचे फायदे

आता एलआयसीकडून ग्राहकांच्या फायद्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधा दिली जाणार आहे. एलआयसी कार्ड सर्व्हिसेस (LIC Cards Services Limited LIC CSL) आणि आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) संयुक्त विद्यमाने दोन नवीन रुपे क्रेडिट कार्ड लाँच (RuPay Credit Cards) करण्यात आले आहेत.

आता एलआयसीकडून ग्राहकांच्या फायद्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधा दिली जाणार आहे. एलआयसी कार्ड सर्व्हिसेस (LIC Cards Services Limited LIC CSL) आणि आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) संयुक्त विद्यमाने दोन नवीन रुपे क्रेडिट कार्ड लाँच (RuPay Credit Cards) करण्यात आले आहेत.

आता एलआयसीकडून ग्राहकांच्या फायद्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधा दिली जाणार आहे. एलआयसी कार्ड सर्व्हिसेस (LIC Cards Services Limited LIC CSL) आणि आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) संयुक्त विद्यमाने दोन नवीन रुपे क्रेडिट कार्ड लाँच (RuPay Credit Cards) करण्यात आले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 जुलै: LIC च्या विविध योजनांकडे विश्वासार्ह इन्शुन्स योजना म्हणून पाहिले जाते. सुरक्षित भविष्याकरता आयुष्यातील विविध टप्प्यांवर या योजना खरेदी करण्याला अनेजजण पसंती देतात. दरम्यान आता एलआयसीकडून ग्राहकांच्या फायद्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधा दिली जाणार आहे. एलआयसी कार्ड सर्व्हिसेस (LIC Cards Services Limited LIC CSL) आणि आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) संयुक्त विद्यमाने दोन नवीन रुपे क्रेडिट कार्ड लाँच (RuPay Credit Cards) करण्यात आले आहेत. ‘Lumine’ Platinum Credit Card आणि  LIC CSL ‘Eclat’ Select Credit Card अशी या कार्ड्सची नावं आहेत.

काही विशिष्ट ग्राहकांसाठी एलआयसीची ही कार्ड सुविधा असणार आहे. यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या प्रेस रीलिजनुसार,  एलआयसी पॉलिसीधारक, एलआयसी एजंट आणि एलआयसी इंडियाचे कर्मचारी तसेच सहाय्यक असतील या कार्ड्ससाठीचे ग्राहक असतील. या क्रेडिट कार्ड धारकांना योजनांमध्ये मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा काही सर्वोत्कृष्ट फायदेही मिळतील. LIC-IDBI ने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट मर्यादा प्रेक्षकांच्या जीवनशैलीला अनुरूप असेल.

हे वाचा-'या' सहकारी बँकेचा परवाना RBI ने केला रद्द,ठेवीदांराच्या रकमेवर काय होणार परिणाम

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कार्ड्सअंतर्गत काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. एक फायदा असा आहे, या कार्ड्सवरुन खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयामागे Lumine कार्डधारकाला तीन डिलाइट पॉइंट्स मिळतील आणि Eclat कार्ड वापरणाऱ्या 4 पॉइंट्स मिळतील. जेव्हा ग्राहक पॉलिसी (LIC insurance policy) रिन्यूअल किंवा प्रीमियम भरणार असतील तेव्हा त्यांना दुप्पट रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

Lumine card धारकाला 1000 वेलकम बोनस डिलाइट पॉइंट्स देखील मिळतील, जेव्हा कार्डधारक 60 दिवसांच्या आत 10000 रुपये कार्डवरुन खर्च करतील. या सेम ऑफरसाठी Eclat कार्डधारकांना 1500 पॉइंट्स मिळतील. या दोन्ही कार्डधारकांना एअर अॅक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर, अपघाती/कायमचे अपंगत्त्व विमा, क्रेडिट शील्ड कव्हर आणि झिरो लॉस्ट कार्ड लायबिलिटी इ. फायदे मिळतील.

हे वाचा-2 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; 31 जुलै आहे शेवटची तारीख, आजच करा हे काम

IDBI बँकेचे एमडी आणि सीईओ राकेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे क्रेडिट कार्ड्स लाँच करताना ग्राहकांचं आरोग्य, मनोरंजन, ट्रॅव्हेल आणि विविध प्रकारचे फायदेशीर रिवॉर्ड्स पॉइंट्सचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान LIC CSLचे सीई राकेश कुमार यांनी असं म्हटलं आहे की, 'आमचं ध्येय विविध फायदे/कार्ड प्रदान करून डिजिटल व्यवहारांचे मूल्य वाढवणे आहे, ज्यामुळे खरेदीदार आणि प्राप्तकर्ता दोघांच्या वेळ आणि ट्रान्झॅक्शनच्या किंमतीत बचत होते.'

400 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या व्यवहारासाठी 1 टक्के फ्युएल सरचार्ज माफीचा लाभ कार्डधारकांना मिळू शकेल. शिवाय कार्डधारकांना 3,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर EMI ची सुविधा मिळेल. ही सुविधा या ग्राहकांना फोरक्लोजर शुल्काशिवाय मिळेल. दोन्ही प्रकारच्या कार्डधारकांना 3, 6, 9 आणि 12 महिन्याच्या EMI चा पर्याय मिळेल. त्याचप्रमाणे Eclat कार्डधारकांना आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर या कार्डधारकांना कॉम्प्लीमेंटरी लाउंज अॅक्सेस मिळेल.

First published:
top videos

    Tags: LIC, Money