मराठी बातम्या /बातम्या /मनी /2 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; 31 जुलै आहे शेवटची तारीख, आजच करा हे काम

2 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; 31 जुलै आहे शेवटची तारीख, आजच करा हे काम

डिझेल भरा, बक्षिसं जिंका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर जाऊन 25 लिटर किंवा त्याहून जास्त लिटर्स डिझेल तुमच्या वाहनात भरावं लागेल.

डिझेल भरा, बक्षिसं जिंका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर जाऊन 25 लिटर किंवा त्याहून जास्त लिटर्स डिझेल तुमच्या वाहनात भरावं लागेल.

डिझेल भरा, बक्षिसं जिंका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर जाऊन 25 लिटर किंवा त्याहून जास्त लिटर्स डिझेल तुमच्या वाहनात भरावं लागेल.

    नवी दिल्ली 30 जुलै : तुम्हाला 2 कोटी रुपये कमवायचे आहेत? मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलने (Indian Oil) आपल्या ग्राहकांसाठी 2 कोटी रुपये (How to become a Crorepati in India) जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरनुसार कंपनीच्या पेट्रोल पंपांवर तुम्ही पेट्रोल भरलं की तुम्हाला या स्पर्धेत भाग घेता येणार आहे, ज्यातून तुम्ही कमवू शकाल 2 कोटी रुपये. हो इंडियन ऑईलची ऑफर आहे ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका (Diesel Bharo, Inaam jeeto).’ या ऑफरचा फायदा 18 वर्षांपेक्षा मोठ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला घेता येऊ शकतो. इंडियन ऑईलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. जाणून घेऊया काय आहे माहिती.

    Indian Oil ची अशी आहे ऑफर

    डिझेल भरा, बक्षिसं जिंका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर जाऊन 25 लिटर किंवा त्याहून जास्त लिटर्स डिझेल तुमच्या वाहनात भरावं लागेल. त्यासाठी अट अशी आहे की हे 25 लिटर डिझेल तुम्ही एकावेळीच भरलं पाहिजे म्हणजे त्याचं एकच बिल तयार झालं पाहिजे.

    बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या Cryptocurrency बाबत सर्वकाही

    इथे करा SMS

    25 लिटर डिझेल भरल्यावर तुम्हाला सिंगल प्रिटेंड बिल (Single Printed Bill) मिळेल. त्यावरचा बिल नंबर आणि डिलर कोड (Dealer Code) तुम्हाला 7799033333 नंबरवर SMS करायचा आहे. मेसेजमध्ये पहिल्यांदा डिलर कोड टाइप करा स्पेस द्या आणि नंतर बिल नंबर टाका त्यानंतर स्पेस देऊन किती लिटर डिझेल भरलं ते लिहा आणि मग 7799033333 नंबरवर कोड पाठवून द्या.

    हा एसएमएस पाठवल्यावर तुम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. एकाच पेट्रोल पंपावरून दोन वेळा 25 लिटर डिझेल भरलं तर किंवा दोन पंपांवरून (Petrol Pump) दोन वेळा डिझेल भरलंत तरीही तुम्हाला प्रत्येक बिल वेगळंवेगळं घेऊन त्याचा एसएमएस पाठवता येईल. म्हणजे तुम्हाला अनेक एंट्रीज पाठवता येतील. एका मोबाईल क्रमांकावरून तुम्ही दोन बिलं पाठवू शकता.

    सोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे? आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर

    31 जुलै 2021 शेवटची तारीख

    वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईलची (Indian Oil) ही ऑफर 31 जुलै 2021 रात्री 12 वाजेपर्यंत लागू आहे. कंपनीने याचे नियमही स्पष्ट केले आहेत. जर ग्राहकानी कुठल्याही कारणास्तव बिल नंबर एसएमएस केला नाही तर त्याला जबाबदार कंपनी नाही. त्याचबरोबर प्रिंटेड बिल नंबर पाठवल्यानंतर ते हरवलं किंवा डिजिटल बिल पाठवल्यावर ते डिलिट झालं तर कंपनी ग्राहकाला बक्षिस मिळालं तरीही देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रिंटेड बिल आणि डिजिटल बिल दोन्हीही सांभाळून ठेवा.

    कुणाला मिळणार फायदा जाणून घ्या

    इंडियन ऑइलच्या या स्पर्धेत फक्त त्याच ग्राहकांना सहभागी होता येईल जे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल खरेदी करतील. कमीतकमी 25 लिटर ते जास्तीत जास्त 2500 लिटर डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना बिल नंबर एसएमएस करून या स्पर्धेत सहभागी होता येईल. XTRAMILE डिझेल खरेदी करणारेही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

    First published:
    top videos

      Tags: Discount offer, Petrol and diesel