• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Zomato IPO: यादिवशी ओपन होणाऱ्या आयपीओमध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल! अवघ्या 72-76 रुपयात खरेदी करा शेअर

Zomato IPO: यादिवशी ओपन होणाऱ्या आयपीओमध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल! अवघ्या 72-76 रुपयात खरेदी करा शेअर

Zomato IPO: झोमॅटोचा आयपीओ 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड 72-76 रुपये निश्चित केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 जुलै: तुम्ही फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अर्थात आयपीओ (IPO) च्या माध्यमातून चांगली कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. झोमॅटोचा आयपीओ (Zomato IPO) 14 जुलै रोजी खुला होणार असून 16 जुलै रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड 72-76 रुपये निश्चित केला आहे. बऱ्याच काळापासून गुंतवणूकदार या आयपीओच्या प्रतीक्षेत होते. या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी 9000 रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करेल तर 375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. कंपनीतील सर्वात मोठा गुंतवणूकदार असणारे इंफो एज ऑफर फॉर सेल (Offer for sale) मध्ये त्यांचा स्टेक विकत आहेत. हे वाचा-Gold Rate Today in Pune: काय आहे पुण्यातील सोन्याचांदीचा दर,इथे वाचा लेटेस्ट भाव 27 जुलै रोजी कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. एंकर गुंतवणूकदारांसाठी तो 13 जुलै रोजी खुला केला जाईल. हा आयपीओ महत्त्वाचा आहे कारण एसबीआय कार्डनंतर झोमॅटोचा हा सर्वात मोठा आयपीओ असेल. गेल्यावर्षी एसबीआय कार्डने आणलेला आयपीओ 10,355 कोटी रुपयांचा होता. किती कराल किमान गुंतवणूक? झोमॅटोच्या या IPO मध्ये प्राइस  बँड 72 ते 76 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये एक लॉट साईझ 195 शेअर्सची आहे. म्हणजे तुम्हाला किमान 195 शेअर्स खरेदी करावे लागतील. या आयपीओमध्ये तुम्ही 14 ते 16 जून दरम्यान गुंतवणूक करू शकता. 22 जुलैरोजी शेअर्सचे वाटप होईल तर 26 जुलैला हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरित केले जातील. 27 जुलै रोजी कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध होईल अशी अपेक्षा आहे. वेगाने वाढला Zomato चा व्यवसाय इंफो एजने याआधी 750 कोटींचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यामध्ये पन्नास टक्क्यांची कपात करत  375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 65 लाखांचे शेअर्स रिझर्व्ह आहेत. Zomato चा व्यवसाय देखील वेगाने वाढत आहे. फिक्सल इयर 2018 मध्ये कंपनीची ऑर्डर 3.06 कोटी होती, त्यात वाढ होऊन फिक्सल इयर 2020 मध्ये ती 40.31 कोटी झाली आहे. हे वाचा-RBI ने SBI सह या 14 बँकांना ठोठावला दंड, बँक ऑफ महाराष्ट्राचाही समावेश झोमॅटोचं उत्पन्न वाढलं कंपनीची सरासरी ऑर्डर व्हॅल्यू फिस्कल इयर 2020 मध्ये 279 रुपये होती, जी यावर्षीच्या 9 महिन्यांसाठी 398 रुपये झाली आहे. या दरम्यान डिस्काउंट 21.7 रुपयांवरुन कमी होऊन 7.3 रुपयांवर आलं आहे. गेल्या काही महिन्यात झोमॅटोचं उत्पन्न वेगाने वाढलं आहे. फिस्कल इयर 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये उत्पन्न 1367 कोटी आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: