Home /News /pune /

Gold Rate Today in Pune: काय आहे पुण्यातील सोन्याचांदीचा दर, इथे वाचा लेटेस्ट भाव

Gold Rate Today in Pune: काय आहे पुण्यातील सोन्याचांदीचा दर, इथे वाचा लेटेस्ट भाव

या महिन्याच्या पहिल्या तारखेला (Gold Rates on 1st July 2021 in Pune) पुण्यामध्ये सोन्याचे दर 46,190 (22 कॅरेट) रुपये प्रति तोळा होते. जाणून घ्या आज पुण्यामध्ये सोन्याचे दर किती आहेत.

    पुणे, 08 जुलै: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळतो आहे. पुण्यामध्ये देखील या आठवड्यात सोन्याचे (Gold Price Today) काही प्रणात वर-खाली झाले आहेत. या महिन्याच्या पहिल्या तारखेला (Gold Rates on 1st July 2021 in Pune) पुण्यामध्ये सोन्याचे दर 46,190 (22 कॅरेट) रुपये प्रति तोळा होते. तर 24 कॅरेट सोन्याचा दरही 47,190 रुपये प्रति तोळा इतका होता. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हे पुण्यातील सोन्याचे (Gold Rates in Pune) दर आहेत. तर 1 तारखेपासून आज 8 जुलैपर्यंत सोन्याच्या दरात 790 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 46980 रुपये आणि 47980 रुपये प्रति तोळा झाले आहेत. काय आहेत पुण्यातील सोन्याचे आजचे दर? (Gold Price in Pune) गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,980 रुपये प्रति तोळा आहे. बुधवारी पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,970 रुपये प्रति तोळा होते. त्यामध्ये आज 10 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे. तर बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 47,970 रुपये होते, त्यात 10 रुपयांची वाढ होऊन दर प्रति तोळा 47,980 रुपये झाले आहेत. अर्थात 22 कॅरेटच्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4698 रुपये तर 24 कॅरेटच्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4798 रुपये आहे. हे वाचा-खूशखबर! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, 8750 रुपयांनी स्वस्त आहे सोनं काय आहेत पुण्यातील आजचे चांदीचे दर? (Silver Price in Pune) आज पुण्यामध्ये चांदीच्या दरात (Silver Price) मोठी घसरण झाली आहे. प्रति किलो चांदीचे दर 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर आजचे पुण्यातील चांदीचे दर 69000 हजार प्रति किलो झाले आहेत. बुधवारी याठिकाणी चांदीचे दर 70 हजारांवर होते. या महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थात 1 जुलै रोजी चांदीचे दर 68700 रुपये प्रति किलो होते. त्यानुसार 8 दिवसांत चांदीच्या दरात एकूण 300 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. या काळात चांदीचे दरात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Pune, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या