Home /News /money /

Home Loan: ही बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, वाचा किती आहे व्याजदर

Home Loan: ही बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, वाचा किती आहे व्याजदर

कर्जाच्या बाबतीत खाजगी बँकांनी सार्वजनिक बँकांना मागे टाकले आहे. कोटक महिंद्रा बँक गृहकर्जावर (Home Loan) सर्वात कमी व्याज देते

    नवी दिल्ली, 23 जानेवारी: कोरोना काळात (Coronavirus) लोकांमधील खरेदी क्षमता वाढावी याकरता आरबीआयने अनेक उपायांची अंमलबजावणी केली आहे, ज्याचा फायदा आता दिसू लागला आहे. सातत्याने कमी होणाऱ्या रेपो रेटमुळे गृहकर्जावरील व्याजदर आधीच सात टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. आता प्रतिस्पर्धा वाढवण्यासाठी बँकांनी त्यांचे व्याजदर घटवले आहेत. व्याजदराच्या बाबतीत पहिल्यांदा खाजगी बँकांनी सरकारी बँकांना मागे टाकले आहे. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) गृहकर्जावर सर्वात कमी अर्थात 6.75 टक्के व्याज आकारते. कोटक महिंद्रा बँकेने एका प्रेस रीलीजच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी डिजिटल आणि सोशल मीडिया अभियान लाँच केल्याची माहिती देखील यामधून दिली आहे. त्यांनी याप्रकारे देण्यात येणाऱ्या व्याजदराला अनबिलिव्हेबल होम लोन असं नाव दिलं आहे. बँकेचे असे म्हणणे आहे कोरोनामुळे मोठं आणि आरामदायक घर घेण्याच्या लोकांच्या इच्छेला प्रोत्साहित केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लोकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि अशावेळी त्यांच्या घरांच्या गरजा वाढल्या आहेत. (हे वाचा-…तर बक्षीस म्हणून Elon Musk देणार 729 कोटी रुपये, ही आहे अट) दरम्यान कोटक महिंद्रा नंतर यूनियन बँक देखील कमी व्याज देते. यूनियन बँकेचे व्याजदर देखील एसबीआय (SBI) इतकेच म्हणजे 6.80 टक्के आहे. कॉर्पोरेट उधारीमध्ये कमी वाढ झाल्यामुळे बँका आता रिअल इस्टेटमधील होम लोनमध्ये अधिक तेजी दाखवत आहेत. 2020 या वर्षात बाजारातील देण्यात आलेल्या एकूण गृहकर्जापैकी बँकांची हिस्सेदारी 66%, एनबीएफसीची 34% होती. 2021 मध्ये ही अनुक्रमे 75% आणि 25% झाली आहे. अर्थात एनबीएफसीच्या भागात साधारण 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2019 मध्ये हाउसिंग फायनान्समधील तिसरी मोठी कंपनी असणारी DHFL ही कंपनी कर्जबाजारी झाल्याने मुख्यत: ही घसरण झाली आहे. यानंतर ग्राहकांनी त्यांचा मोर्चा बँकांकडे वळवला आहे. (हे वाचा-Gold Rate Today: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, गुंतवणूकदारांना दिलासा) का मिळत आहेत ऑफर्स? बँकेचे जॉइंट प्रेसिडेंट एलिझाबेझ वेंकटरमन यांच्या मते घर घेणाऱ्या अनेकांची स्वप्न पूर्ण होत नाहीत. आता कोटक महिंद्राकडून लोकांना कमी व्याजदराने कर्ज मिळेल. कोरोनामुळे अनेकांना स्वत:चं घर हवी असण्याची गरज प्रकर्षाने जाणवली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan, Sbi home loan

    पुढील बातम्या