मस्क यांनी का केली कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीबाबत बक्षिसाची घोषणा? एलॉन मस्क यांनी केलेली घोषणा त्यांच्या विविध प्रकारच्या उद्योगांशी संबंधित आहे. अलीकडे त्यांचे विविध उद्योग पर्यावरण समस्या संपवण्यासाठी तांत्रिक उपाय शोधत आहेत. वातावरणातील बदल संतुलित ठेवण्यासाठी अनेक प्लँट्समधून उत्सर्जन रोखणे हे देखील त्यापैकी एक आहे. दरम्यान या तंत्रज्ञानाचा अद्याप इतका विकास झाला नाही आहे. सध्या, हवेतून कार्बन काढून टाकण्याऐवजी त्याचे उत्सर्जन कमी करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने असे सांगितले होते की असे तंत्रज्ञान लवकरात लवकर आणण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे कार्बन कॅप्चर करता येईल. जगातील बर्याच देशांमध्ये, नेट-झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक असेल.Am donating $100M towards a prize for best carbon capture technology
— Elon Musk (@elonmusk) January 21, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tesla