जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, लग्नसराईमध्ये गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा

Gold Rate Today: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, लग्नसराईमध्ये गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा

Gold Rate Today: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, लग्नसराईमध्ये गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा

Gold Rates on 22nd January, Friday: शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. तीन दिवसांनंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जानेवारी: देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. तब्बल तीन दिवसांनी सोन्याचे दर उतरले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात 22 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले आहेत. आज चांदीच्या दरात देखील (Silver Price Today) घट झाली आहे. सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे दर कमी झाल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कमजोर मागणीमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने सोन्याचांदीच्या किंमतीबाबत ही माहिती दिली आहे. सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 22nd January 2021) दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोनं प्रति तोळा 263 रुपयांनी स्वस्त झालं आहे. लग्नसराईच्या सोन्याच्या दरात काहीशी घसरण देखील गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. या घसरणीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 48,861 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,124 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,861 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा- …तर बक्षीस म्हणून Elon Musk देणार 729 कोटी रुपये, ही आहे अट) चांदीचे आजचे भाव (Silver Price on 22nd January 2021) सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये देखील शुक्रवारी घसरण झाली आहे. चांदी 806 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 66,032 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात गुरुवारी चांदीचे भाव 66,838 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव 25.52 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. (हे वाचा- PNB ग्राहक असाल तर लक्ष द्या! फेब्रुवारीपासून या ATM मधून काढता येणार नाहीत पैसे ) एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, न्यूयॉर्कचे कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर कमजोरीनंतर दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 263 रुपयांची घसरण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात