Home /News /money /

जनधन खात्यात पैसे मिळाले की नाही? या नंबरवर मिस्ड कॉल देऊन घरबसल्या घ्या जाणून

जनधन खात्यात पैसे मिळाले की नाही? या नंबरवर मिस्ड कॉल देऊन घरबसल्या घ्या जाणून

तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.

नवी दिल्ली, 08 मे: देशात कोरोनाच्या (Corona)  रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दर दिवशी 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांमध्ये वाढ झाली आहे. या कठीण काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊया, घरबसल्या खात्यातील बॅलन्सची माहिती कशी घ्यायची. खात्यातील रकमेची माहिती मिळण्याचे सोपे पर्याय तुम्ही दोन पर्यायांपैकी एक निवडून तुमच्या जनधन खात्यातील बॅलन्सची माहिती मिळवू शकता. पहिला आहे पीएफएमएस पोर्टल आणि दुसरे म्हणजे मिस्ड कॉलच्या माध्यमातून. 1. पीएफएमएस (PFMS) पोर्टल पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला या https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx#   लिंकवर जावे लागेल. तिथे तुम्हाला Know Your Payment ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकावा लागेल. तिथे तुम्हाला दोन वेळा तुमचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरला की तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स तुम्हाला दिसेल. हे वाचा-सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्या दागिन्यांवर होणार परिणाम? 2. मिस्ड कॉल - तुमचं जनधन खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून अकाऊंट बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1800425380 या अथवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल. नवीन जनधन खाते कसे उघडायचे? प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (Pradhan Mantri Jandhan Yojana)  माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते. -तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. -त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. हे वाचा-अवघ्या 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय; दर महिन्याला होईल 1 कोटी कमाई -अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. -तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाऊंट उघडू शकता.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Money, Pradhan mantri jan dhan yojana, SBI, State bank of india

पुढील बातम्या