Home /News /money /

अवघ्या 50 हजारात सुरू करा हा बिझनेस; दर महिन्याला होईल 1 कोटी कमाई, जाणून घ्या या व्यवसायाबद्दल

अवघ्या 50 हजारात सुरू करा हा बिझनेस; दर महिन्याला होईल 1 कोटी कमाई, जाणून घ्या या व्यवसायाबद्दल

स्वतःचा व्यवसाय (Business Idea) करायचा असेल, तर अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलावर कोट्यवधी रुपयांची कमाई करून देणारा एक व्यवसाय तुम्ही करू शकता. हा व्यवसाय आहे ऑनलाइन होर्डिंग्जचा (Digital Hoardings Business).

नवी दिल्ली, 6 मे : तुम्ही नोकरीला (Job) कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय (Business Idea) करायचा असेल, तर अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलावर कोट्यवधी रुपयांची कमाई करून देणारा एक व्यवसाय तुम्ही करू शकता. हा व्यवसाय आहे ऑनलाइन होर्डिंग्जचा (Digital Hoardings Business). आजच्या या डिजिटलायजेशनच्या युगात ऑनलाइन होर्डिंग्जच्या व्यवसायातून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. यासाठी‘News18’ने आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी ‘गो होर्डिंग्जडॉटकॉम’च्या (Gohoardings.com) संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा (Deepti Awasthi Sharma) यांच्याशी संवाद साधला. दीप्ती या ऑनलाइन होर्डिंग्जच्या व्यवसायातून दरमहा 1 कोटीपेक्षा जास्त कमाई करत आहेत. वर्षभरात कोटींची कमाई - दीप्ती अवस्थी शर्मा यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी 2016 मध्ये ऑनलाइन होर्डिंग्जचा व्यवसाय सुरू केला. हातात जास्त पैसे नसल्यानं त्यांनी सुरुवातीला फक्त 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि व्यवसाय सुरू केला. पुढच्या एका वर्षातच त्यांना 12 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतरच्या वर्षात त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 20 कोटींपेक्षा जास्त झाला. हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना दीप्ती म्हणाल्या,‘डिजीटल होर्डिंग्जच्या व्यवसायाबद्दल थोडं संशोधन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की या क्षेत्रात असंघटीतपणे (Unorganized) काम चालते. डिजिटलायजेशनमुळे (Digitalization) लोकांना घरबसल्या सगळ्या सुविधा हव्या असतात. त्यामुळे या क्षेत्रात भरपूर संधी असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 50 हजार रुपयांत हा व्यवसाय सुरू केला आणि अगदी कमी कालावधीत चांगली प्राप्ती होऊ लागली.’

(वाचा - दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करुन कमावू शकता 50 लाख रुपये;जाणून घ्या काय आहे योजना)

कसा सुरू केला हा व्यवसाय - मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या आधारे हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी, तुम्हाला तुमच्या डोमेन नावासह एक वेबसाइट तयार करावी लागेल. त्याची जाहिरात करावी लागेल. सुरुवातीला कुठे आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती देण्यासाठी लोक उत्सुक आहेत याचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. सध्याच्या काळात लोकांना घरबसल्या जाहिराती द्यायच्या असल्यानं आता हा व्यवसाय चांगला चालतो. कशी काम करते दीप्ती यांची कंपनी - ज्यांना या कंपनीची सेवा घ्यायची आहे त्यांना सर्वांत आधी गो होर्डिंग्जडॉटकॉम या वेबसाइटवर लॉग-इन करावे लागते. त्यानंतर लोकेशन (जिथं होर्डिंग लावायची आहेत) सिलेक्ट करावं लागेल. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनीतर्फे साइट आणि लोकेशन उपलब्धतेचं कन्फर्मेशन पाठवलं जातं. त्यानंतर ग्राहकांकडून आर्टवर्क आणि ऑर्डर घेतली जाते. लोकेशन साइटवर लाईव्ह जाण्यासाठी एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. त्यानंतर जाहिरात सुरू होते. ही कंपनी एकहोर्डिंग एक महिनाभर लावण्यासाठी साधारण एक लाख रुपये घेते.
First published:

Tags: Money, Small investment business

पुढील बातम्या