मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI ने रद्द केला तीन नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचा परवाना, हे आहे कारण

RBI ने रद्द केला तीन नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचा परवाना, हे आहे कारण

नॉन बँकिंग फाइनेंस कंपनी (NBFC) देशातील बँका (Bank) आणि मार्केटमधून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि छोट्या शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. NBFC मध्ये व्याज दर (Rate of interest) बँकांच्या तुलनेत अधिक असतो.

नॉन बँकिंग फाइनेंस कंपनी (NBFC) देशातील बँका (Bank) आणि मार्केटमधून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि छोट्या शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. NBFC मध्ये व्याज दर (Rate of interest) बँकांच्या तुलनेत अधिक असतो.

नॉन बँकिंग फाइनेंस कंपनी (NBFC) देशातील बँका (Bank) आणि मार्केटमधून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि छोट्या शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. NBFC मध्ये व्याज दर (Rate of interest) बँकांच्या तुलनेत अधिक असतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 08 जानेवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने तीन नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा (NBFC) परवाना रद्द केला आहे. तर अन्य 6 NBFC नी त्यांचा परवाना आरबीआयकडे सरेंडर केला आहे. याआधीही आरबीआयने अनेक NBFC चा परवाना बिझनेस नसल्या कारणाने रद्द केला आहे. याच कारणामुळे काही NBFC नी त्यांचा परवाना सरेंडर देखील केला आहे. जाणून घ्या कोणत्या NBFC चा परवाना रद्द केला आहे आणि कुणी सरेंडर केला आहे.

काय आहे NBFC चे काम?

नॉन बँकिंग फाइनेंस कंपनी (NBFC) देशातील बँका (Bank) आणि मार्केटमधून पैसे उधार घेऊन ग्रामीण आणि छोट्या शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. NBFC मध्ये व्याज दर (Rate of interest) बँकांच्या तुलनेत अधिक असतो. मात्र एनबीएफसीकडून कर्ज घेताना लोकांना अधिक कागदपत्रांची गरज भासत नाही. त्यामुळे अशा भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना सहज कर्ज उपलब्ध होते.

(हे वाचा-Small Investment Business: फक्त दहा हजारांत सुरू करा हा व्यवसाय; होईल मोठी कमाई)

कोणत्या NBFC चा परवाना झाला रद्द?

आरबीआयने 3 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा (NBFC) परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या NBFC चा  परवाना आरबीआय कायदा 1934 मधील कलम 45-I च्या सेक्शन A मधील नियमानुसार काम न केल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील Abhinav Hire Purchase, गुरुग्राम मधील Jupiter Management Services आणि आसममधील NE Leasing and Finance यांचा समावेश आहे.

कोणत्या  NBFC नी केला परवाना सरेंडर?

दरम्यान या तीन एनबीएफसी व्यतिरिक्त अन्य 6 NBFC नी त्यांचा परवाना सरेंडर केला आहे. या कंपन्यांनी देखील  आरबीआय कायदा 1934 नुसार काम  करू शकल्या नाहीत. यामध्ये नोएडा मधील Raghukul Trading, वाराणसीमधील  Divya Tie-Up, नवी दिल्लीतील Girnar Investment, अंधेरी (मुंबई) याठिकाणची  Choice International, जयपूरमधील Devyani Infrastructure and Credits त्याचप्रमाणे गुवाहाटीमधील JK Builders and Property Developers ने त्यांचा परवाना सरेंडर केला आहे.

(हे वाचा-पेट्रोल-डिझेल विकत घेताना वापरा SBI चे हे डेबिट कार्ड, मिळतील या ऑफर्स)

कोरोना पँडेमिक सर्वात महत्त्वाचे कारण

तज्ज्ञांच्या मते, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात आर्थिक व्यवहास संथ झाले होते, परिणामी एनबीएफसी योग्य पद्धतीने काम करण्यास असमर्थ होत्या. बाजारामध्ये कर्जाची मागणी कमी असल्यामुळे NBFC चे व्यवहार संथ पडले होते. यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news