नवी दिल्ली, 8 जानेवारी : जगभरात सगळीकडे कोरोना साथीमुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत. अशावेळी हा व्यवसाय मेणबत्त्या बनवण्याचा (Candle Making)आहे . उपचार पद्धतीसाठी (Therapy) आवश्यक असलेल्या खास मेणबत्त्या तसंच डिझायनर (Designer) मेणबत्त्यांना मोठी मागणी आहे. या व्यवसायासाठी तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार भांडवल वापरून घरच्या घरी हा व्यवसाय सुरू करू शकता.
डिझायनर मेणबत्त्या :
बाजारपेठेत (Market)मेणबत्त्यांची मागणी कायम असते. त्यामुळे छोट्याशा प्रमाणात सुरुवात केला, तरी मोठा ब्रँड (Brand)बनण्याची संधी यात आहे. अनेक प्रकारच्या मेणबत्त्या असतात. त्या बनवण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. दररोजच्या वापरात असणाऱ्या पांढऱ्या मेणबत्त्या, खास कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझायनर मेणबत्त्या असे अनेक प्रकार असतात. बाजारात कोणत्या मेणबत्त्यांची अधिक मागणी आहे, याचा अंदाज घ्या आणि तुम्हाला कोणत्या मेणबत्त्या बनवायच्या आहेत, हे नक्की करा.
अरोमा थेरपीसाठी लागणाऱ्या मेणबत्त्या :
आजकाल अरोमाथेरपी (Aromatherapy)ही उपचार पद्धती लोकप्रिय झाली आहे. यात सुगंधी (Fregrance) मेणबत्त्यांचा वापर केला जातो. या विशेष मेणबत्त्या बनवून चांगली कमाई करता येते.
घरातच बनवा मेणबत्त्या :
मेणबत्त्या बनवण्यासाठी कच्चा माल आणि काही उपकरणांची गरज आहे. तुम्ही ज्या प्रकारच्या मेणबत्त्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार साहित्य आणि उपकरणं घ्यावी लागतील. त्यादृष्टीने भांडवल जमा करावं लागेल. किमान दहा हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो.
बँकेचं कर्ज, सरकारी योजनांचा फायदा घ्या :
तुम्हाला भांडवल उभं करणं शक्य नसेल, तर छोट्या उद्योगांसाठी बँका कर्ज देतात किंवा काही सरकारी योजनांद्वारेही आर्थिक मदत केली जाते. त्यांची माहिती घेऊन त्याद्वारे भांडवल जमा करा.
व्यवसायासाठी जागा निश्चित करा :
मेणबत्या बनवणे, पॅकिंग करणे आणि तयार माल साठवणे यासाठी जागेची गरज आहे. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय करणार असाल, तर एक वेगळी खोली असणं आवशयक आहे, किंवा तुम्ही भाडेतत्वावरही एखादी खोली घेऊ शकता.
आकर्षक नाव ठेवा :
तुमच्या उत्पादनाच्या नावावरून बाजारपेठेत त्याची ओळख होते. त्यामुळे तुमच्या उत्पादनाला आकर्षक नाव द्या. त्याची नोंदणी आणि आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या व्यवसायाचा श्री गणेशा करा.
पॅकिंगकडे विशेष लक्ष द्या :
उत्पादन बनवल्यावर त्याच्या पॅकिंगवरही (Packing)विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही सजावटीसाठीच्या किंवा सुगंधी मेणबत्त्या बनवत असाल, तर त्याचं पॅकिंग मजबूत आणि आकर्षक असणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.