नवी दिल्ली, 08 जानेवारी: जर तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) खरेदी साठी दर महिन्याला खर्च करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. SBI ने लॉंच केलेलं डेबिट कार्ड (Debit Card) तुम्हाला या खरेदीवेळी बचत करण्यात मदत करेल. भारतीय स्टेट बॅंक (State Bank of India) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) ने मिळून को-ब्रांडेड कॉन्टॅक्टलेस रूपे डेबिट कार्ड लॉंच करण्याची घोषणा केली आहे.
हे कार्ड पूर्ण देशात लॉंच करण्यात आले आहे. इंडियन ऑइल स्टेशनवर 200 रुपये खर्च करणाऱ्या ग्राहकाना 6 रिवॉर्ड पॉइंट्स आणि 0.75 टक्के लॉयल्टी पॉइंट्स मिळतील.
याअंतर्गत ग्राहक डायनिंग, मूव्ही, ग्रोसरी आणि यूटिलिटी बिलाच्या करचवर रिवॉर्ड पॉइंट कमावू शकतात आणि ते रिडीम करू शकतात. शिवाय इंधन खरेदी करण्यासाठी कोणतीही मासिक मर्यादा नाही आहे. हे डेबिट कार्ड भारतात कुठेही जारी केले जाऊ शकते. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही SBI होम ब्रांच मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
कशाप्रकारे सुरक्षित ठेवाल ATM आणि पिन? SBI ने ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती
5000 रुपयांपर्यंत करू शकता पेमेंट
आरबीआयने नुकतीच यावर्षी टॅप अँड गो वैशिष्ट्यानुसार 5000 रुपयांपर्यंत देय देण्यास मान्यता दिल्यानंतर कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर एसबीआय-आयओसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून 'टॅप अँड गो' तंत्रज्ञानाद्वारे 5 हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट देखील केले जाऊ शकते.
छोटी गुंतवणूक मोठा फायदा : LIC NPS फंडामध्ये मिळतोय सर्वात जास्त फायदा
SBI चेअरमन दिनेश कुमार खारा यांच्या मते, 'या को-ब्रांडेड कार्डमध्ये टॅप अँड गो तंत्रज्ञानासह आणखीही आकर्षक ऑफर्म मिळतील. कार्डधारकांना इंधन खरेदीवर ना केवळ रिवार्डिंगचा अनुभव मिळेल, पण हा पर्याय रोजच्या जीवनातील वस्तू खरेदी करण्यासाठी सुरक्षित स्वरुपात सरळ ठरेल'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel