Home /News /money /

घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होऊ शकेल पूर्ण, ही आहेत फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं

घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होऊ शकेल पूर्ण, ही आहेत फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं

घर घेण्याचं स्वप्न तुम्ही लॉकडाऊननंतर पूर्ण करू शकता. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारकडून सिस्टिमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आणली जाईल. याचा परिणाम रिअल इस्टेटवर होणार आहे.

    नवी दिल्ली, 06 मे : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांची वाताहत झाली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या क्षेत्रांना उभारी देण्याचं एक आव्हानच व्यवस्थेसमोर असणार आहे. दरम्यान ज्या क्षेत्रांंना लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे, त्यापैकी एक क्षेत्र रिअल इस्टेट देखील आहे. या क्षेत्राचा देखील कारभार धीम्या गतीनेच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊननंतर घर घेण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारकडून सिस्टिमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आणली जाईल. याचा परिणाम रिअल इस्टेटवर होणार आहे. कोरोना व्हायरसचे संकट येण्याआधी फ्लॅट्सच्या किंमती 30 टक्क्यांनी घसरल्या होता, आता लॉकडाऊनचा परिणाम या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात तुम्ही घर घेणे फायद्याचे ठरेल. (हे वाचा-लॉकडाऊनचा सोन्यावर मोठा परिणाम, एप्रिल महिन्यात 30 वर्षातील सर्वात कमी खरेदी) -लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सिस्टिमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आणण्याची व्यवस्था करत आहे. आर्थिक व्यवहार जे लॉकडाऊनमुळे ठप्प आहेत, त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारकडून लोन देखील देण्याची व्यवस्था केली जाईल. अशावेळी बँकांकडे लोन देण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. जर बाजारात योग्य प्रमाणात लोन उपलब्ध झाले तर रिअल इस्टेट कंपन्यांच्या किंमती देखील कमी होतील. जेणेकरून जास्तीत जास्त फ्लॅट्सची विक्री होईल. -जास्तीत जास्त लोन देण्यासाठी बँकांकडून व्याजदर कमी केला जाण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट कंपन्यांकडून देखील विक्री वाढवण्यासाठी विविध ऑफर्स मिळण्याची दाट शक्यता आहे. (हे वाचा-Paytm अलर्ट! ग्राहकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते फसवणूक) -गेल्या दीड वर्षांपासून अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. रिअल इस्टेट कंपन्यांकडे विकल्या न गेलेल्या फ्लॅट्सची संख्या जास्त आहे. त्यांची विक्री करण्यासाठी बिल्डर्सवर दबाव वाढत आहे. परिणामी लॉकडाऊनंतर किंमती कमी होण्याची शक्यता जास्त आहे. -लॉकडाऊनच्या संकटाशी सामना करण्यासाठी सरकारकडून मध्यम वर्गासाठी विविध योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. कर्जावरील व्याजदर कमी करणे ही एक महत्त्वाची योजना आखली जाऊ शकते. मध्यम वर्गासाठी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा काळ फायद्याचा ठरेल. (हे वाचा-PhonePe वापरून घरबसल्या करू शकता चांगली कमाई, सोन्यामध्ये देखील गुंतवणूक शक्य) -रिअल इस्टेटमध्ये गती आणण्यासाठी सरकारकडून देखील या कंपन्यांवर भाव कमी करण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो. मागणी वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या