नवी दिल्ली, 05 मे : वॉलमार्टचा (Walmart) मालकी हक्क असणारी डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने आदित्य बिर्ला सन लाइफबरोबर (Adity Birla Sun Life) पार्टनरशीपमध्ये एक नवीन इनव्हेसस्टमेंट सोल्युशन सुपर फंड लाँच केला आहे. यामुळे आता कुणीही फोनपेच्या माध्यमातून इक्विटी, सोने किंवा डेट फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये काही म्युच्यूअल फंड कंपन्यांमध्ये (Mutual Fund Companies) देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. जोखीम उचलण्याची क्षमता आणि इनव्हेस्टमेंट सायकलच्या आधारावर कोणताही गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतो. Paytm ला टक्कर देण्यासाठी फोनपेने ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये विविध आर्थिक सेवांचे अनेक पर्याय असतील आणि गुंतवणूकदारांना एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होईल. (हे वाचा- इंग्रजी येत नसून बनले लोकप्रिय ZOOM अॅपचे सर्वेसर्वा,आज 48.44 हजार कोटी संपत्ती ) कंपनीच्या दाव्यानुसार त्यांचे 20 कोटी रजिस्टर्ड युजर्स आहेत. ज्यांना सोनेखरेदी, टॅक्स सेव्हिंग्ज फंड, लिक्विड फंड्स, आंतरराष्ट्रीय प्रवास विमा यांसारखे अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामध्ये कोव्हिड-19 पँडेमिक (COVID-19 Pandemic) साठी देखील विशेष विमा कव्हर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर इक्विटी, सोने किंवा डेट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराला अधिक जोखीम पत्करत गुंतवणूक करायची आहे तर त्यांच्याासाठी अधिक प्रपोर्शनचे इक्विटी फंड्स देखील उपलब्ध आहेत. कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डेट फंडमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत फोनपेकडून माहिती देण्यात येत आहे. कमीतकमी 500 रुपयांची गुंतवणूक शक्य या फंड्सना आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्यूअल फंड मॅनेजर मॉनिटर करतील आणि मार्केट कंडिशनच्या आधारावर गुंतवणूकदारांना शूल्क द्यावे लागेल. गुंतवणूकदारांसाठी विशेष बाब म्हणजे ते 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. संपादन- जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.