टेलिग्रामवरून होत आहे फसवणूक शर्मा यांनी ट्विटरवर ज्या युजरच्या तक्रारीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, त्यावरून असे लक्षात येते की ही फसवणूक एका टेलिग्राम ग्रृपच्या माध्यमातून होत आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे भामटे ग्राहकांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगत आहेत आणि तेच पैसे त्यांना दुप्पट करून मिळतील असं आमिष दाखवण्यात येत आहे. ज्या युजरने तक्रार केली आहे, त्याचे देखील 2000 रुपये बुडाले आहेत. (हे वाचा- इंग्रजी येत नसून बनले लोकप्रिय ZOOM अॅपचे सर्वेसर्वा,आज 48.44 हजार कोटी संपत्ती) याआधी देखील पेटीएम केवायसीच्या नावावर फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. एवढच नव्हे तर कॉलवरून होणाऱ्या व्हेरिफिकेशन दरम्यान लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकवर क्लिक करायला सांगून पैसे लंपास केले जातात. फिशिंगची अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुद्धा पेटीएमवरून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले होते. तेव्हा देखील संस्थापकांनी पेटीएमशी निगडीत बनावट फोन कॉल, एसएमएस अलर्टपासून सावधान राहण्याचा इशारा दिला होता. संपादन-जान्हवी भाटकरAnd here, someone’s priorities are so wrong ‼️ Why would you send money to someone , and expect double in return 🙄😑⁉️ Never fall for such illogical baits❌ https://t.co/X9QGNzXRI2 pic.twitter.com/VdxiWvmO7h
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) May 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm Money