नवी दिल्ली, 05 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि देशातील ज्वेलरी शॉप्स बंद आहेत. परिणामी सोन्याची आयात (Gold Import) 99.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही गेल्या 3 दशकांंमधील ही सर्वात कमी आहे. Reuters च्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात भारतामध्ये केवळ 50 किलो सोनं आयात करण्यात आले आहे. ही माहिती सरकारी सूत्रांच्या आधारे देण्यात आली आहे. साधारणत: एप्रिल-मे महिन्यात अक्षय्य तृतीया आणि लगीनसराईचे दिवस असल्यामुळे सोन्याची मागणी जास्त असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सोन्याच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. (हे वाचा- Paytm अलर्ट! ग्राहकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते फसवणूक ) भारत सोने आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. मात्र एप्रिल महिन्यात केवळ 50 किलो सोने आयात करण्यात आली. गेल्या वर्षी या कालावधी दरम्यान 110.18 टन सोन्याची आयात करण्यात आली होती. किंमतीच्या दृष्टीने आयात गेल्यावर्षीचा 3.97 बिलियन डॉलरच्या तुलनेत कमी होऊन 2.84 मिलियन डॉलर झाली आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या अनेक इंडस्ट्रीज बंद आहेत. भारतामध्ये सोन्याची अधिकांश आयात हवाई मार्गाने केली जाते. मात्र हवाई वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे हे नुकसान झाले आहे. (हे वाचा- PhonePe वापरून घरबसल्या करू शकता चांगली कमाई, सोन्यामध्ये देखील गुंतवणूक शक्य ) देशामध्ये 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. 54 दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. सराफा बाजार सुद्धा बंद आहेत. त्यातच या कालावधीत होणार लग्नसोहळे देखील रद्द होत आहेत किंवा अत्यंत साध्या पद्धतीने केले जात आहेत. त्यामुळे देशातील सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.